Breaking News

सैनिकी शाळेतील कोव्हिड केअर सेंटर सुरू

सैनिकी शाळेतील कोव्हिड केअर सेंटर सुरू

*लसीकरणाचा वेग वाढवा, नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या
*तातडीच्या बैठकीत महापौर राखी कंचर्लावार यांचे निर्देश

चंद्रपूर, ता. १६ : कोव्हिडची लाट थोपवायची असेल तर लसीकरण हा एकमेव प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवा. नवे लसीकरण केंद्र सुरू करा. नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या, असे निर्देश महापौर राखी कंचर्लावार यांनी दिले.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता महापौर राखी कंचर्लावार यांनी शुक्रवारी (ता. १६) तातडीची बैठक घेतली. बैठकीला स्थायी समिती सभापती रवि आसवानी, उपायुक्त विशाल वाघ, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, डॉ. नरेंद्र जनबंधू उपस्थित होते.
सदर बैठकीत कोरोनासंदर्भात चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. शहरातील कोव्हिड हॉस्पिटलची संख्या वाढविण्यात काय काय अडचणी आहेत, चाचणी केंद्रावर सध्या किती चाचण्या केल्या जात आहेत, लसीकरणाचे केंद्र वाढविण्यासाठी काय करता येईल, याची माहिती उपायुक्त विशाल वाघ आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे यांनी दिली. चाचण्यांसोबतच लसीकरण केंद्र वाढविण्यात यावे आणि कोव्हिड हॉस्पिटल वाढविण्यासंदर्भातील अडचणी दूर करण्यात याव्या, असे निर्देश महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले.
सैनिकी शाळेतील कोव्हिड केअर सेंटर सुरू
गृह विलगीकरण शक्य नसलेल्या कोव्हिड रुग्णांसाठी शहरात चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मूल मार्गावरील वनराजिक महाविद्यालयात (वन अकादमी) २९० क्षमतेचे कोव्हिड केअर सेंटर सुरू आहे. आता बल्लारपूर मार्गावरील शासकीय सैनिकी शाळेत दुसरे केंद्र सुरू करण्यात आले असून त्याची क्षमता १५० खाटांची आहे. त्याठिकाणी रुग्णांची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र चमू नेमण्यात आल्याची माहिती महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिली.

About Vishwbharat

Check Also

बडी ही चमत्कारी है वनौषधीय काली हल्दी से चोर शत्रु भय का नाश और धनवर्षा का योग

बडी ही चमत्कारी है वनौषधीय काली हल्दी से चोर शत्रु भय का नाश और धनवर्षा …

आंखों से चश्मे के बिना दिखता नहीं! रोशनी बढ़ाने का घरेलू आयुर्वेदिक इलाज

आंखों से चश्मे के बिना दिखता नहीं! रोशनी बढ़ाने का घरेलू आयुर्वेदिक इलाज   टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *