Breaking News

गत 24 तासात  1300  कोरोनामुक्त, 1529 पॉझिटिव्ह तर 23 मृत्यू

Advertisements

गत 24 तासात  1300  कोरोनामुक्त,

Advertisements

1529 पॉझिटिव्ह तर 23 मृत्यू

Advertisements

Ø आतापर्यंत 37,715 जणांची कोरोनावर मात

Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 15,843

चंद्रपूर, दि. 26 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 1300 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1529 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 23 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 54 हजार 369 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 37 हजार 715  झाली आहे. सध्या 15 हजार 843 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 59 हजार 554  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 478 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील श्यामनगर परिसरातील 58 वर्षीय पुरुष, श्रीराम वार्ड येथील 47 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथील 65 वर्षीय महिला व 67, 50 वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील 58,70 व 72  वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथील 45 वर्षीय महिला, राजुरा तालुक्यातील चुनाभट्टी वार्ड येथील 41 वर्षीय पुरुष, चुनाळा येथील 65 वर्षीय पुरुष,

चिमूर तालुक्यातील बोथली येथील 37 वर्षीय महिला, खडसंगी येथील 70 वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील 62 वर्षीय पुरुष, व 47 वर्षीय महिला, गोंडपिपरी तालुक्यातील 67 वर्षीय महिला व 51 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील भवानी वार्ड येथील 62 वर्षीय पुरुष, देलनवाडी येथील 65 वर्षीय पुरुष ,गडचांदूर येथील 40 वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी येथील 58 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील 60 वर्षीय पुरुषाचा तर गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील 74 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत 811 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 747, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 27, यवतमाळ 25, भंडारा सहा, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1529 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 621, चंद्रपूर तालुका 61, बल्लारपूर 60, भद्रावती 138, ब्रम्हपुरी 112, नागभिड 27, सिंदेवाही 38, मूल 73, सावली 20, पोंभूर्णा 11, गोंडपिपरी 43, राजूरा 31, चिमूर 73, वरोरा 120, कोरपना 59, जिवती 21 व इतर ठिकाणच्या 21 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर : महादुला के श्रीवास नगर मे नि:शुल्क नेत्र जांच शिबीर को अच्छा-खासा प्रतिसाद

  ✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री कोराडी।विश्ववंदनीय डा बाबासाहब आंबेडकर की 132 वें जन्मोत्सव उपलक्ष्य मे महादुला …

नागपूर हायकोर्टातील चंदनाचे झाड पळविण्याचा प्रयत्न : दोघांना अटक

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ (हायकोर्ट)परिसरातील चंदनाचे झाड तोडून ते पळविण्याचा प्रयत्न दोन चोरट्यांनी केल्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *