ग्रामीण भागात कोविड दक्षता केंद्र उभारा- खा. बाळू धानोरकर यांचे निर्देश
वरोडा-
वरोडा शहरात व ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढत आहे. शहरात उभारण्यात आलेले कोरोना दक्षता केंद्र अपुरे पाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ज्या व्यक्तींंचा अहवाल सकारात्मक आला असेल, त्यांच्यावर त्याच परिसरात उपचार व्हावे यासाठी ग्रामीण कोरोना दक्षता केंद्राची तातडीने उभारणी करावी, असे निर्देश खा. बाळू धानोरकर यांनी दिली.
वरोडा येथील शासकीय विश्रामगृहात खा. बाळू धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली आ. प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत अधिकार्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसीलदार प्रशांत बेडसे, संवर्ग विकास अधिकारी संजय वानखेडे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळ मुंजनकर, इंदिरा काँग्रेस तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर आदींची उपस्थिती होती.
कोरोना केअर केंद्रामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णास नातेवाईक व इतरांना भेटण्यास बंदी घालण्यात आली आहे. अति महत्वाच्या कामाकरिता रुग्णाची भेट घ्यावयाची असल्यास विभागीय अधिकार्यांची परवानगी घेणे बंधन कारक करण्यात आले आहे.
