Breaking News

अमृतच्या नविन नळ ग्राहकांना जलमापकाव्दारे देयक

Advertisements
अमृतच्या नविन नळ ग्राहकांना जलमापकाव्दारे देयक
महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी
चंद्रपूर, ता. ६ : केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत चंद्रपूर शहर पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. अमृत अभियानअंतर्गत टाकण्यात आलेल्या पिण्याचे पाईपलाईनवर नविन नळ जोडणीवर जलमापक यंत्रे लावण्यात येत आहे. पाणी पुरवठा योजनेतील अटीनुसार पाणी देयक हे जलमापक यंत्र बसवून घेण्यात येणार आहे. या कामाला येणाऱ्या खर्चास महानगरपालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी प्रदान केली.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील राणी हिराई सभागृहात गुरुवारी (ता. ६) स्थायी समितीची सभा पार पडली. यावेळी स्थायी समिती सभापती रवी आसवानी, उपायुक्त अशोक गराटे, स्थायी समिती सदस्य सर्वश्री संजय कंचर्लावार, सुभाष कासनगोट्टूवार, देवानंद वाढई, वनिता डुकरे, शीतल आत्राम, सविता कांबळे, वंदना तिखे, ज्योती गेडाम, अनिल रामटेके, प्रदीप डे, निलेश खोब्रागडे, विना खनके, मंगला आखरे, आदी उपस्थित होत्या. 
सभेच्या प्रारंभी झोन ३चे सभापती स्व.अंकुश सावसाकडे, माजी पालकमंत्री एकनाथ गायकवाड, माजी मंत्री संजय देवतळे, माजी स्वीकृत सदस्य अनिल त्रिवेदी यादीसह कोरोनामुळे मृत पावलेल्याना सभागृहात दोन मिनिटे मौन पाळून श्रदांजली वाहण्यात आली.  
महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. यात वडगाव प्रभागातील नागपूर रोड ते साईबाबा मंदिर ते दिनुजी भवन येथील ओव्हरहेड लाईन भूमिगत करणे, एमईएल प्रभागातील कालेशाहबाबा दर्गा ते नूरानी कब्रस्थानपर्यंत पथदिवे लावणे, पत्रकारभवन जुना वरोरा नाका येथे सोलर प्रकल्प उभारणे, महिला व बालकल्याण समिती सभा अंतर्गत सिमेंट बेंचेस खरेदी करणे, बाबुपेठ प्रभागात बाबुपेठ स्मशानभूमी येथे सपाटीकरण व काँक्रीट पाथ बांधकाम, भानापेठ प्रभागातील व्यायामशाळेचे नूतनीकरण आदी कामाचा समावेश आहे.  
 सध्यास्थितीत शहरातील पाणी वितरणकरीता पाईप लाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. अस्तित्वातील नळ कनेक्शन नविन टाकण्यात येणाऱ्या वितरण व्यवस्थेवर स्थलांतरीत करण्याचे काम अमृत अभियानाच्या मंजुर प्रकल्पात अंतर्भूत आहे. शहरातील अस्तित्वातील व नविन घरगुती व बिगर घरगुती नळ कनेक्शनवर जलमापक यंत्र बसविणे बंधनकारक आहे. नगर विकास विभागाच्या  ०१ ऑगस्ट २०१० च्या निर्णयानुसार ग्राहकांना पाणी पुरवठा जलमापकान्दारे करण्यात यावा. सदरची विहित दर्जाची जलमापके शक्यतो ग्राहकाकडून बसवून घ्यावी किंवा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी अशी जलमापके बसविल्यास जलमापकाची रक्कम ग्राहकाकडून जलदेयकामधून हप्ते पाडून वसुल करण्यात यावी, अशी तरतुद आहे. त्यानुसार शहरातील अस्तीत्वातील ३२,२१० नळ कनेक्शनवर जलमापक यंत्र बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. 
चंद्रपूर शहरामध्ये रहिवासी, वाणिज्य व इतर अश्या एकुण ८६ हजार ९४७ मालमत्तांची नोंद आहे. अस्तीत्वातील नळ कनेक्शनची संख्या ३२ हजार २१० आहे. उर्वरित ५४ हजार ७३७ मालमत्तांना नळ कनेक्शन जोडणी करावी लागणार आहे. अमृत अभियान अंतर्गत शहरातील पिण्याचे पाईप लाईन टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. दि. २६/०२/२०२० चे सर्वसाधारण सभा ठराव क्र . ४० अन्वये जलमापक यंत्राची किंमत वगळुन नळ जोडणी शुल्कास १०० टक्के सुट देण्यास मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी नविन पाईप लाईन टाकण्यात येत आहे. ज्या मालमत्ताला नळ जोडणी नाही, अश्या सुध्दा मालमत्तांना नविन नळ जोडणी करण्यात येत आहे. अमृत अभियानअंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम जवळपास ८० टक्के पूर्ण झालेले आहे. काही झोनमध्ये कामसुध्दा जवळपास पुर्ण झालेले आहे. झोननुसार पाणी पुरवठा सुरु करण्याकरीता अमृत अभियान अंतर्गत करण्यात आलेले नविन नळ जोडणी नियमीत करणे गरजेचे आहे. त्यामुळे अस्तित्वातील नळ कनेक्शन व्यतिरीक्त नविन करण्यात आलेल्या नळजोडणी जलमापक यंत्र बसवून नियमीत करणे आवश्यक आहे. त्यास १९.२८कोटी खर्च अपेक्षीत आहे. 
नळजोडणीवर विहित दर्जाची जलमापके लावण्याकरिता येणारा खर्च ग्राहकाकडुन एकमुस्त किंवा हप्ते पाडुन वसुल करण्यात येणार आहे. या कामाला येणाऱ्या खर्चाला तथा नविन नळजोडणीवर जलमापक लावण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
————
अग्निशमन वाहन मनपा हद्दीबाहेर गेल्यास सेवा शुल्क
महानगरपालिका हद्दीबाहेर पुरविण्यात येणाऱ्या अग्निशमन वाहन सेवेच्या शुल्काच्या दराची निश्चीती करण्यात आली आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीच्या आजुबाजुला लहान मोठी गावे, जंगल आहे. या ठिकाणी आगीची घटना झाल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्याची जबाबदारी संबधीत स्थानिक प्राधिकरणाची आहे. पण, संबधीत स्थानिक प्राधिकरणाकडे कोणत्याही प्रकारची यंत्रणा अस्थित्वात नसल्यामुळे चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत सदर ठिकाणी सेवा पुरविण्यात येते. सदर ठिकाणे मनपा हद्दीबाहेर असल्यामुळे संबधीत स्थानिक प्राधिकरण / शासकीय कार्यालये तर्फे अग्निशमन सेवा शुल्क भरणा करणे गरजेचे आहे. त्याकरीता अग्निशमन सेवा शुल्क पहिल्या तासाला रु. २०००/- त्यानंतरच्या प्रत्येक तासाला रु. १००० /- प्रमाणे दरास स्थायी समितीने मंजुरी प्रदान केली आहे. याशिवाय अग्निशमन विभागातील तीन फायर टेंडर स्पेअर पार्टसह दुरुस्ती व देखभाल कामासाठी मंजुरी देण्यात आली.
————
पॉझिटिव्ह रुग्णांच्या परिसरात निर्जन्तुकीरण करा : सभापती रवी आसवानी
शहरातील नागरिंकाना कोरोनाची लागण होऊ नये आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांच्या परिसरात निर्जन्तुकीरण करा, असे निर्देश सभापती रवी आसवानी यांनी दिलेत. त्यासाठी ३ नवीन फॉगिंग मशीन खरेदी करण्यात याव्यात, ज्या भागात पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याची माहिती मिळते, याचवेळी फवारणी आणि निर्जन्तुकीरण करण्यात यावे, शहरात बंद पडलेले पथदिवे नव्याने लावावेत, नियमांचे उल्लघंन करून रस्स्त्यावर दुकाने थाटणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *