श्वेता रूग्णालयाची कोरोना मान्यता रद्द
– रूग्णांकडून जादा पैसे घेतल्याचा ठपका
चंद्रपूर,
महानगरातील श्वेता रूग्णालय व्यवस्थापनाने कोरोना रूग्णांकडून जादा पैसे घेतल्याचा ठपका ठेवत या रूग्णालयाची कोरोना रूग्णालय म्हणून मान्यता रद्द करण्यात आली आहे. मनपाच्या या कारवाईने अन्य खासगी डॉक्टरांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेने जिल्ह्यात थैमान घातले. शहरापासून गावखेड्यापर्यंत रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येऊ लागले. अचानकपणे वाढलेल्या रुग्णसंख्येने शासकीय यंत्रणेचा ताण वाढला. रुग्णांना खाटा मिळणे कठीण झाले. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली. त्यानुसार एकट्या चंद्रपूर शहरात 21 खासगी रुग्णालयांना परवानगी दिली गेली. त्यात श्वेता रूग्णालयामधील 30 खाटांचा समावेश होता. त्यासाठी शासनाने दर निर्धारित करून दिले आहेत. मात्र, सुरुवातीपासून हे रुग्णालय वादग्रस्त ठरले आहे.
कोरोना रुग्णांकडून अतिरिक्त पैसे उकळत असल्याचे आरोप केले जात होते. काही रुग्णांच्या नातेवाइकांनी यासंबंधीची चित्रफित तयार करून समाजमाध्यमावर प्रसारित केली. हातगावकर कुटुंबीयांकडून तीन दिवसांपोटी 1 लाख 7 हजार रुपये बिलापोटी घेतल गेलेे. त्यानंतर हातगावकर कुटुंबियांनी महापालिकेच्या लेखा विभागाकडून ऑडिट केले. तेव्हा तब्बल 34 हजार 700 रुपये अतिरिक्त घेतल्याचे समोर आले. या सर्व प्रकारानंतर महापालिकेने गंभीरतेने पाऊले उचलून श्वेता हॉस्पिटलचा परवाना रद्दची कारवाई केल्याची माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे यांनी दिली.
Check Also
BJP मंडलाध्यक्ष चुनाव में खींचतान : लाठी डंडों और बेल्ट से मारपीट से मचा हंगामा
BJP मंडलाध्यक्ष चुनाव में खींचतान : लाठी डंडों और बेल्ट से मारपीट से मचा हंगामा …
रायपुर में 2 फर्जी कंपनियों का पर्दाफाश : विदेशों से लिंक
रायपुर में 2 फर्जी कंपनियों का पर्दाफाश : विदेशों से लिंक टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …