Breaking News

चला जाणून घेऊया ”म्युकोर मायकोसिस बद्दल” – डॉ. मंगेश गुलवाडे 

Advertisements

चला जाणून घेऊया ”म्युकोर मायकोसिस बद्दल” – डॉमंगेश गुलवाडे 

Advertisements

म्युकोर मायकोसिस हा बुरशीजन्य [फंगस ] संसर्ग रोग आहे,श्यकतो हा रोग ‘म्युकोरेल्स’ या फंगस मुळे होतो.

Advertisements

   आज आपण कोविड  १९ या महामारीच्या रोगविरोधात लढत आहोत. या रोगविरोधात लढतांना कोविड पश्चात दुष्परिणाम व उपचार याचा देखील विचार करावा लागणार आहे. कोविड च्या रोगांसाठी वापरण्यात येणाऱ्या बऱ्याच औषध समूहापैकी  स्टिराइड्स  चा देखील वापर मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे.   आणि यामुळेच रुग्णांची प्रतिकार शक्ती देखील कमी होत आहे याचाच  दुर्भाग्यपूर्ण फायदा बुरशी [फंगस] घेतात  व आपले ब्रस्तान मांडतात.

नाकाच्या सर्दीवाटे हि बुरशी नाकामध्ये सायनस मध्ये फुफुसामध्ये तोंडामध्ये डोळ्यापासून  ते मेंदूपर्यंत पोहचते. या बुरशीच्या संसर्गाचा वेग सर्वाधिक असून उपचारासाठी कमी वेळ मिळतो. लवकर निदान झाले तर औषोधोपचाराने इलाज होऊ शकतो , जर उशीर झाला तर शस्त्रक्रिया करण्याची वेळ येऊ शकते. डोळ्यांशी संसर्ग पोहचल्यास त्यांना कायम स्वरूपाची इजा होऊ शकते व अंधत्व देखील येऊ शकते.बऱ्याचदा डोळे काढण्याची देखील गरज पडू शकते हा संसर्ग मेंदूपर्यंत पोचल्यास उपचार करणे दुरापास्त  होते व रुग्ण दगावू शकतो.

रिक्स फॅक्टर्स –  खालील रोग सोबतीला असल्यामुळे म्युकोर मायकोसिस ची लागण लवकर होते हायपरटेन्शन मधुमेह 

१.हायपरटेन्शन .

२. मधुमेह

३. HIV / AIDS असणे .

४. कोविड १९ ची उपाययोजना./ औषोधोपचार करणे

५. जास्त वेळ स्टिरॉईड्स चा वापर करणे.

६. कँसर

७. सिरॉसिस ऑप लिव्हर

८. मूत्रपिंड आजार

९. लट्ठपणा असणे

निदान करण्यासाठी लक्षणे 

नाक– वारंवार सर्दी होणे.

नाकातून  दुर्गंधयुक्त वास येणे.

नाक बंद होऊन श्वास घेण्यास त्रास होणे.

नाकातून काळ्या रंगाची सर्दी वाहने.

सायनस दुखणे ,चेहरा सुजणे, सतत ताप येणे

तोंड  घसा 

तोंडाचा दुर्घन्ध येणे

तोंडातून पस येणे

दातांची रचना खिळखिळी होऊन दात ठिसूळ होणे व पडणे दातांची जखम न भरणे

डोळे 

डोळे दुखणे

डोळ्यांची कमी दिसणे

डोळे सुजणे

 मेंदू 

डोके दुखणे

मेंदूच्या नसांचा त्रास होणे

मेंदू अकार्यक्षम होणे

फुफुस 

सतत खोकला असणे

दम लागणे

रक्ताच्या उलट्या होणे

निदान कसे करणार 

१. नाकाची दुर्बिणीद्वारे तपासणी

२.पॅथॉलॉजिकल लॅब तपासण्या ,रक्त तपासणी आवश्यकता असल्यास [मेंदूतील द्रव तपासणी ]

३. रेडिमोलॉजिकल

नाकाचा एक्सरे PNS[ Para Nosal Sinus]

CT PNS

मेंदू चा MRI

४. बायोप्सी [ Biopsy]

नाकाच्या दुर्बीण द्वारे बुरशीचा तुकडा घेऊन ची  Biopsy तपासणी करणे.

वरील लक्षणे आढळ्यास खालील डॉक्तरांचा सल्ला घेणे व वेळेवर उपचार करून घेणे.

१. ENT सर्जन

२. नेत्र रोग तज्ज्ञ

३. दंत रोग तज्ज्ञ

४. मॅक्सिल फेशिअल सर्जन

औषोधोपचार कसा करावा 

म्युकोर मायकोसिस चे निदान झाल्यानंतर खालीलप्रमाणे औषधोपचार साधारणपणे २ ते ३ आठवडे कारण

१. मेडिकल मॅनेजमेंट

इंजेक्शन –अँफोटेरीसिन बी डॉक्सीक्लोरेट   [ Amphootericin B  Doxychlorate]

इंजेक्शन – लायपोसोमंल अँफोटेरिसीन बी 

इंजेक्शन – अँफोटेरिसीन बी लिपिड कॉम्प्लेक्स

२.इसावुकोनाझोल पोसैकोनझोल

३. हायेरटेंशन / मधुमेह व इतर रोगांच्या उपचार

सर्जिकल मॅनेजमेंट 

इ एन टी सर्जन, ओठ व मॅक्सिलोफेशिअल  सर्जन, नेत्र रोग तज्ज्ञ,

प्लास्टिक सर्जन व न्यूरो सर्जन या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यकतेनुसार आपरेशन करून घेणे.

या म्युकोर मायकोसिस आजाराचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्वांमध्ये बदक करणे आवश्यक आहे. प्रामुख्याने कोरोना रुग्णांवर उपचार करतांना आवश्यकतेनुसार अत्यल्प प्रमाणात स्टिरॉइडचा वापर करणे गरजेचे आहे. प्रामुख्याने हायरिस्क असलेल्या रुग्णांमध्ये हा संसर्ग असल्यास धोका जास्त आहे, आणि म्हणूनच कोरोनाच्या उपचार दरम्यान अँटी फंगल च्या औषधांच्या वापर करणे आवश्यक आहे.

कोरोनाचे संकट मोठे आहे मात्र त्यानंतर सुद्धा या बुरशीजन्य आजाराच्या मध्यमातून रुग्णांच्या जीवाला धोका आहे. आणि म्हणूनच कोविड नंतर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करून आवश्यकतेनुसार  म्युकोर मायकोसिस या रोगाचा उपचार करून घेणे हि काळाची गरज आहे.

डॉ.मंगेश गुलवाडे MBBS MS [ENT]अध्यक्ष ,इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर 

Advertisements

About Vishwbharat

Check Also

शारीरिक ताकत बढाने के लिए इमली के बीज का पावडर के उपयोग के रामबाण फायदे

शारीरिक ताकत बढाने के लिए इमली के बीज का पावडर के उपयोग के रामबाण फायदे …

लैंगिक लकबा (पेनिस पिरालेसेस) नपुंसकता सहित अन्य असाध्य गुप्तरोग समस्या निवारण के लिए रामबाण वनौषधीय है अतिवला का पौधा

लैंगिक लकबा (पेनिस पिरालेसेस) नपुंसकता सहित अन्य असाध्य गुप्तरोग समस्या निवारण के लिए रामबाण वनौषधीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *