Breaking News

परिचारीका दिनी हंसराज अहीर यांचे व्दारा परिचारीका भगिनींचा सन्मान

परिचारीका दिनी हंसराज अहीर यांचे व्दारा परिचारीका भगिनींचा सन्मान
परिचारीकांची सेवा ही महानतेची प्रतिक
चंद्रपूरः- परिचारीकांचे रूग्णसेवेतील कार्य नेहमीच अत्यंत महान राहीले आहे. त्यांच्या या सेवाकार्याचे ऋण चुकविने कुनालाही शक्य नाही. कोरोनाच्या संकटकाळात अत्यंत   धिरोदात्तपणे, कर्तव्यपरायणतेने रूग्णांची सातत्याने सेवा करीत राष्ट्रकार्यात योगदान देणाऱ्या तमाम परिचारीका पुज्यनीय असून त्यंाच्या या अविरत रूग्णसेवेच्या ऋणाचा सन्मान करने हे सर्वांचे आद्यकर्तव्य असल्याची भावना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी परिचारीका दिनानिमित्य परिचारीका भगिनींचा सन्मान करतांना व्यक्त केली.
दया व सेवेची प्रतिकृती असलेल्या व आधुनीक काळातील सेवा कार्याच्या जन्मदात्या ल्फारेंस नाईटिंगेल यांच्या जयंती स्मृत्यर्थ जगभरात साजरा होणाऱ्या परिचारीका दिनाचे औचीत्य साधुन दि. 12 मे रोजी हंसराज अहीर यांनी शासकीय रूग्णालयाच्या कोविड रूग्णालयात जावून परिचारीका भगिनींचा पुष्पगुच्छ देवून सन्मान केला. कोरोा सारख्या संकट काळात राष्ट्र व रूग्णसेवेचा वसा घेवून जिवावर उदार होत त्यांच्याव्दारे होत असलेली सेवा शब्द अन विचारांपलीकडची आहे अशा सद्भावना व्यक्त केल्या. त्यांना परिचारीका दिनाच्या तसेच निरामय आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शासकीय रूग्णालयाचे डाॅ. मोहारे, डाॅ. जिवने, डाॅ. ठाकरे यांचेसह परिचारीका भगिनींची उपस्थिती होती.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *