Breaking News

कोरोनाच्या धर्तीवर कौतुकास्पद कार्य., नोकारी(पाल)येथे युवकांकडून ग्रामस्वच्छता अभियान.

कोरोनाच्या धर्तीवर कौतुकास्पद कार्य.
नोकारी(पाल)येथे युवकांकडून ग्रामस्वच्छता अभियान.
कोरपना(ता.प्र.):-
     कोरपना तालुक्यातील नोकारी(पाल)येथील युवकांनी ग्रामस्वच्छतेचा वसा हातात घेतल्याचे चित्र आहे.कोरोना महामारीत स्वच्छतेवर अधिक भर देण्याच्या उद्देशाने युवकांनी केलेल्या सदर कामांचे कौतुक होत असून गावात स्वच्छता मय आनंदाचे वातावरण पसरले आहे.तरूणांनी लोकसहभागातून गावातील संपूर्ण गटारे पुर्णपणे साफ केले. गटारांच्या स्वच्छतेमुळे ग्रामपंचायतची जवळपास ५० हजार रुपयांची बचत झाली असून ती रक्कम गाववासीयांच्या आरोग्यावर खर्च करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्वच्छता करणारे युवक सोमा कुळमेथे,रंजन प्रधान, सुरज कन्नाके,लक्ष्मण कन्नाके,गणेश मंडाळी, धनराज सोयाम,विलास मडावी,सुरज मडावी, झित्रु मडावी,विकास कोरांगे,कृतिक कन्नूरवार यांनी ग्रामपंचायतकडे केली आहे.इतर गावातील युवकांनी सुद्धा असे उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे मत सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *