Breaking News

वर्धा बायपास वरील उड्डाण पुलाचे कार्य १५ जुलै पर्यंत पूर्ण होणार, खासदार रामदास तडस यांची माहिती,

Advertisements

वर्धा बायपास वरील उड्डाण पुलाचे कार्य १५ जुलै पर्यंत पूर्ण होणार,

Advertisements

खासदार रामदास तडस यांची माहिती,

Advertisements

वर्धा: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर्धा ते बुट्टीबोरी पॅकेजमध्ये वर्धा बायपास समावेश आहे. सालोड व सावंगी दरम्यान अस्तीत्वास असलेल्या रेल्वे मार्गावर उड्डाणपुलाचे चार पदरी उड्डाणपुलाचे कार्य अंतिम टप्प्यात असुन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरण यांच्या नियोजनानुसार 15 जुलै  पंर्यत सदर उड्डाणपुलाचे कार्य पुर्ण होणार असुन लवकरच वर्धा बायपास पुर्णक्षमतेने कार्यान्वीत होणार असल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी दिली.

वर्धा बायपासचा प्रत्यक्ष आढावा घेण्याकरिता व तांत्रीक बाजु समजुन घेण्याकरिता खासदार रामदास तडस यांनी उड्डाणपुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजुचे काम पुर्ण झाले असुन फक्त रेल्वे क्षेत्रात येणा-या जागेतील काम प्रगतीपथावर असुन रेल्वे विभागाच्या वतीने मेघा ब्लाॅक दिल्यानंतर उर्वरीत काम 15 जुलै 2021 पंर्यत पुर्ण होईल असे उपस्थित अधिकारी वर्गानी आढावा घेतांना सांगीतले. यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणचे प्रकल्प संचालक श्री. पी.एन. पागृत, विकसक कंपनीचे अभियंता, प्रकल्पाचे टिम लीडर अखिलेश कुमार पांडे, संसद सदस्य रस्ते सुरक्षा समितीचे सदस्य प्रणव जोशी उपस्थित होते.

वर्धा बायपास वरील प्रस्तावीत उड्डाणपुल प्रगतीपथावर असल्याने सर्व वाहतुक सावंगी टि पांईट, नेरी पूनर्वसन व सालोड येथून जात असल्याने रहदारीस त्रास होते. या उड्डाणपुलाचे कार्य पुर्ण झाल्यावर राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 वरील जड वाहतुक नागठाणा चैकातुन थेट सालोड गावाच्या बाहेर वळती होईल यामुळे वर्धा शहरातील व परीसरातील नागरिकांना जड वाहतुकीचा त्रास मोठया प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. नागठाणा चैकाच्या जवळ पुलाच्या दोन्ही बाजुला पोच मार्ग मंजुर झाला असुन सर्व तांत्रीक बाबी पुर्ण करुन पोच मार्गाचे काम त्वरीत सुरु करण्याच्या सुचना खासदार रामदास तडस यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला दिली.

वर्धा बायपासचे कार्म पुर्ण झाल्यानंतर या मार्गाच उद्घाटन केन्द्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांनी आभासी पध्दतीने करावे अशी विनंती आम्ही करणार असुन वर्धा बायपासमुळे महामार्गावरील प्रवाश्यांच्या व स्थानिक नागरिकांच्या वेळ व इंधनाची मोठी बचत होणार असुन 15 जुलै नंतर निश्चीतच वर्धा बायपास पुर्ण क्षमतेने कार्यान्वीत होईल असा विश्वास यावेळी खासदार रामदास तडस व्यक्त केला.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

BJP आमदार दादाराव केचेंच्या आश्रमशाळेत बालकाचा संशयास्पद मृत्यू

वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला. येथील आश्रमशाळेतील दूरवस्थेद्दल …

वर्धा नदीतून चौघे गेले वाहून

चंद्रपूर जिल्ह्याजवळील वणी तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्रात दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोहण्यासाठी गेलेल्या चार युवकांचा वाहून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *