Breaking News

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचा सोळावा स्थापना दिन;येत्या सहा महिन्यात प्राणवायू प्रकल्प  निर्मिती – कुलगुरू डॉ. राजीव बोरले

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचा सोळावा स्थापना दिन;येत्या सहा महिन्यात प्राणवायू प्रकल्प  निर्मिती – कुलगुरू डॉ. राजीव बोरले
*वर्धा* – सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचा सोळावा स्थापना दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. सध्याचा कोरोना महामारीचा प्रभाव पाहता भविष्यकालीन गरजेची पूर्तता म्हणून येत्या सहा महिन्यात विद्यापीठाद्वारे प्राणवायू प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांनी या समारोहात सांगितले.
कोविड १९ चा संसर्ग थांबविण्यासाठी आयुर्विज्ञान संस्थेअंतर्गत कार्यरत आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय आणि शालिनीताई मेघे सुपरस्पेशालिटी सेंटरद्वारे ७ हजारांहून अधिक रुग्णांना मोफत आरोग्यसेवा देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता ऑक्सिजन प्रोजेक्ट निर्मितीसोबतच पुन्हा नव्याने १०० रुग्णखाटांचा आयसीयु विभागही निर्माण करण्यात येत आहे. सावंगी मेघे रुग्णालय कोरोना चाचणी, लसीकरण आणि जनजागृतीबाबतही अग्रेसर राहिले आहे. येत्या काळातही कोरोनावरील लसी उपलब्ध होताच गावागावांत जाऊन लसीकरण मोहीम राबविणार असल्याचेही डाॅ. बोरले यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी कुलगुरू डाॅ. राजीव बोरले यांच्या हस्ते अभिमत विद्यापीठाचे ध्वजारोहण करण्यात आले. विद्यापीठ परिसरात आयोजित या समारोहाला प्रकुलगुरू डॉ. ललित वाघमारे, कुलसचिव डॉ. बाबाजी घेवडे, सावंगी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. संदीप श्रीवास्तव, विशेष कार्य अधिकारी डाॅ. अभ्युदय मेघे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डाॅ. चंद्रशेखर महाकाळकर, वैद्यकीय शाखेचे अधिष्ठाता डॉ. अभय मुडे, समन्वयक व्ही. आर. मेघे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोना काळातील नियम पाळून या कार्यक्रमाला विविध महाविद्यालयांचे अधिष्ठाता, प्रशासकीय अधिकारी तसेच शिक्षक उपस्थित होते.

About Vishwbharat

Check Also

आंखों में रोशनी बढाने के लिए रामबाण है आंवला

आंखों में रोशनी बढाने के लिए रामबाण है आंवला टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

वडिलांपेक्षा आई लवकर वयस्कर का दिसू लागते?

आई आणि वडिलांचे वय सारखेच असूनही आईच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षणे लवकर दिसून येतात; पण असे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *