Breaking News

शिवराज्यभिषेक दिन सोहळा समस्त महाराष्ट्राची अस्मिता   – आ. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

शिवराज्यभिषेक दिन सोहळा समस्त महाराष्ट्राची अस्मिता
  – आ. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

चंद्रपूर,
सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. तेव्हापासून हा मंगलमय दिवस साजरा केला जात आहे. या सोहळयामुळे महाराजांच्या कर्तृत्वाला राजमान्यता मिळाली. सोनियाचा दिन म्हणून साडेतीन शतकानंतरही हा शिवराज्यभिषेक दिन सोहळा समस्त महाराष्ट्राची अस्मिता म्हणून थाटामाटात साजरा केला जातो, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरतर्फे रविवारी आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली’ कार्यक्रमात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक चंद्रपूर येथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करून आदरांजली अर्पण करीत असताना ते बोलत होते. यावेळी मनपाचे उपमहापौर राहूल पावडे, स्थायी समिती अध्यक्ष रवी आसवानी, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद कडू, शहराध्यक्ष मंगेश गुलवाडे, भाजपा कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, भाजपा मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, रवी लोणकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, महामंत्री प्रज्वलंत कडू, नगरसेविका शितल आत्राम आदी उपस्थित होते.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *