वर्धा:-निराधार व विधवा महिलांसाठी मदतीचा हात
वाढोणा येथील उमेद ने स्थानिक पातळीवर स्थापन केलेल्या ग्रामोन्नती व आदर्श ग्राम संघ कोरोना च्या पार्श्वभूमीवर गावातील निराधार महिला व विधवा महिलांच्या हाताला काम नसून अत्यन्त हालाकिची परिस्थिती ओढवली अशातच ग्रामोन्नती व आदर्श ग्राम संघ या दोन्ही संघातील महिलांनी निर्णय घेऊन 20 कुटूंबाना मदत देत किराणा किट चे वाटप केले,वाटप करते वेळी कोरोना परिस्थिती असल्यामुळे सर्वांनी सुरक्षित अंतर ठेवून कोरोनाचे पालन करण्यात आले सदर कार्यक्रम वाटपाचे नियोजन अक्षय पाली व सौ अर्चना घोडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले तसेच ग्राम संघा चे अध्यक्ष्या सौ सिंधू खुडसंगे ,शशिकला सोमकुवर , रुपाली गाढवे , मंगला भोयर , ममता तांदुळकर, छाया नानंदनकर,अर्चना कळंबे ,अर्चना बारई,मनीषा डहाके,मालू पुनसे ,मंदा बेसेकर आदींची उपस्थिती होती.

उमेदच्या ग्रामोन्नती व आदर्श ग्राम संघाच्या वतीने वाढोना येथील गरजवंतांंना किराणा किट देऊन दिला मदतीचा हात
Advertisements
Advertisements
Advertisements