आक्सीजन काँन्सट्रेटर मशीन ठरत आहे रुग्णांना संजीवनी बूटी.
(लाभार्थ्यांनी मानले सुधीर मुनगंटीवारांचे आभार.)
कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सात वर्षाचा यशस्वी कार्यकाळ नुकताच पुर्ण झाला.या निमित्ताने भाजपातर्फे अनेक जनहिताचे कार्यक्रम राबविण्यात आले.याच श्रेणीत माजी वित्तमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यातर्फे ३० मे रोजी गडचांदूर भाजप कार्यालयाला चार आक्सीजन काँन्सट्रेटर मशीन भेट देण्यात आली.सदर मशीनची सेवा निशुक्ल असून अनेक रुग्णांना ही मशीन अक्षरशः संजीवनी बूटीच ठरत आहे.याचे जिवंत उदाहरण म्हणजे गडचांदूर येथील ६३ वर्षीय “सलीम भाई लांबा” यांना हरनीया नामक रोगाची लागण झाली होती.उपचारासाठी नागपूर येथील डॉ.सुशील वैरागडे यांच्या रुग्णालयात भरती करण्यात आले.शस्त्रक्रियानंतर इतर उपचार सुरू असताना आक्सीजन लेव्हल कमी होत असल्याचे पाहून त्यांना ७ दिवस आईसीयु मध्ये ठेवण्यात आले.
सलीम लांबा यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसत असल्याने घरीच उपचार करू या उद्देशाने यांना दोन दिवसापूर्वीच स्वगावी आणण्यात आले.मात्र आक्सीजनची गरज होतीच.आक्सीजन सिलेंडरसाठी सलीम भाई यांचा मुलगा आसीफ लांबा यांनी राजुरा, बल्लापूर किंवा इतर ठिकाणी जाण्याचे ठरविले.दरम्यान त्यांची भेट येथील भाजपच्या अजी़म बेग याच्याशी झाली.आक्सीजन विषयी विचारपूस केली असता अजी़म यांनी म्हटले की,सुधीर भाऊ यांनी दिलेली आक्सीजन मशीन भाजप कार्यालयात आहे.लगेच यांनी भाजप नगरसेवक अरविंद डोहे व माजी नगरसेवक नीलेश ताजने यांना सविस्तर माहिती देत आक्सीजन काँन्सट्रेटर मशीन लांबा यांच्या घरापर्यंत पोहोचते केले.सलग तीन दिवस लांबा यांनी याचा लाभ घेतला आणि आता त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा बरी झाल्याची माहिती देण्यात आली असून सुधीर भाऊंनी भेट दिलेली आक्सीजन काँन्सट्रेटर मशीन माझ्या वडीलासाठी संजीवनी बुटीच ठरल्याची भावना आसीफ लांबा यांनी “दै.चंद्रधून” प्रतिनिधीपुढे व्यक्त केली सोबतच सुधीर मुनगंटीवार,नगरसेवक डोहे,माजी नगरसेवक ताजने व अजी़म बेग यांचे मनापासून आभार मानले आहे.सध्या परिस्थितीत सदर मशीन नागरिकांना लाभदायक ठरत असून गरजूंनी स्थानिक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.