दालमिया सिमेंट कंपनीत तरूण कामगाराचा मृत्यू. 

दालमिया सिमेंट कंपनीत तरूण कामगाराचा मृत्यू. 
कोरपना(ता.प्र.):-
       कोरपना तालुक्यातील दालमिया सिमेंट कंपनीत उंचीवर काम करीत असताना एका तरूण कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना २९ जून रोजी घडली.संतोष चव्हाण वय अंदाजे २८)असे मृतकाचे नाव असून हा शिवा कंस्ट्रकशनकडे सुपरवायझर म्हणून कामावर होता.उंचीवर काम करीत असताना खाली पडल्याने याला उपचारासाठी गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.मात्र त्याची प्राणज्योत मालवली.घटनेची माहिती मिळताच दालमिया सिमेंट कंपनीतील युनियनचे सर्व पदाधिकारी रुग्णालयात पोहोचले.बातमी लिहिस्तोव मृतकाचे शवविच्छेदन झाले नव्हते. दालमिया कंपनीत मृतकाच्या परिवारातील एकाला स्थायी नोकरी व आर्थिक मदत देण्याची मागणी मृतकाच्या कुटुंब व कामगारातून होत आहे.आगोदरच दालमिया सिमेंटच्या कामगारांनी दोन दिवसापुर्वीच “स्थाई व परप्रांतीय कामगार” या मुद्द्यावरून आंदोलन उभारण्याचा इशारा दिल्याची माहिती असून आता हे प्रकरण कोणतं वळण घेईल ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सदर कंपनीचे काम युद्धपातळीवर सुरू असून येथील कामगारांच्या सुरक्षेकडे अक्षरशः दुर्लक्ष केले जात असल्याचे आरोप होत आहे.यामुळे निष्पाप कामगारांचे जीव धोक्यात असल्याची भीती सदर घटनेवरून निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *