नवी मुंबईच्या प्रस्तावित विमानतळाला “वसंतराव नाईक” यांचं नाव द्या.
(गोर बंजारा ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अमर राठोडांची मुख्यमंत्र्याकडे मागणी.)
कोरपना ता.प्र.:-
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार,कृषी व औद्योगिक क्रांतीचे जनक,नवी मुंबईचे निर्माते, सिडकोचे शिल्पकार तथा हरितक्रांतीचे प्रनेते “वसंतराव नाईक” यांचे कर्तुत्व राज्यासह देशालाही गौरवान्वित करणारे आहे. महाराष्ट्राला सुजलाम,सुफलाम करीत असताना त्यांनी मोठ्या दूरदृष्टीने नवी मुंबईची पायाभरणी व उभारणी केली.तत्कालीन विरोधी पक्षाने नव्या मुंबईच्या निर्मितीला प्रचंड विरोध दर्शविला होता.मात्र दूरदृष्टी असणारे विकासाचे महानायक वसंतराव नाईक यांनी नवी मुंबई उभारली.हे अख्ख्या देशात सर्वश्रुत असताना त्यांच्या या अद्वितीय कार्याच्या सन्मानार्थ प्रास्तावित नवी मुंबई विमानतळाला “वसंतराव नाईक” यांचे नाव देणे उचित ठरेल, असे मत वजा मागणी जिवती न.प.नगरसेवक तथा बांधकाम सभापती,गोर बंजारा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष “अमर राठोड” यांनी तहसीलदार जिवती यांच्या मार्फत पाठवलेल्या निवेदनातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
आधुनिक महाराष्ट्राला घडविणारे वसंतराव नाईक यांच्या सन्मानार्थ भरीव आणि ऐतिहासिक असे आजवर काहीही दिसून आले नाही.ही दुर्दैवी बाब असून वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्ष अंतर्गत प्रस्तावित अनेक बाबी आजही प्रलंबित असल्याची खंत व्यक्त होत आहे.सध्या सुरू असलेल्या नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या वादावरून नवी मुंबईच्या निर्मात्याचे नाव डावलून इतरांचे नाव पुढे केले जात असल्याने वसंतराव नाईक यांच्या अनुयायी ओबीसी बंजारा मागासवर्गीय समाजात प्रचंट अस्तव्यस्तता निर्माण झाली आहे.येत्या १ जुलै २०२१ रोजी कृषी दिन (वसंतराव नाईक जयंती)या पावन पर्वावर वसंतराव नाईक यांच्या नावाने याबाबतीत घोषणा व निर्णय घेणल्याची अपेक्षा व्यक्त करत नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी राठोड यांनी केली आहे.निवेदन देताना अमर राठोड यांच्यासह प्रेम चव्हाण,रोहिदास आडे,निलेश राठोड,अविनाश नागरगोज,राहूल राठोड, देवीदास चव्हाण,सोनू जाधव यांची प्रमुखाने उपस्थिती होती.