नागपूर : नागपूर, चंद्रपूरसह काही जिल्ह्यात विजांसह काही ठिकाणी आज बुधवारी मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, अहमदनगर,औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे. मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारली आहे.आता पुन्हा पाऊस धो-धो बरसेल, असे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील शेतकरी सुखावले आहेत. या पावसापूर्वी कडक ऊन पडल्याने पिकांना पोषक वातावरण तयार झालेले आहे.
