औरंगाबाद : जिल्ह्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, जिल्ह्यात अजून ३९ टक्के तूट आहे.२४ जून रोजी ५१.२ मिमी तर ४ ऑगस्टला ४७.५ मिमी, ७ ऑगस्ट रोजी २२ मिमी, १५ ऑगस्ट रोजी १०.५ पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाने दडी मारली होती.१ जून ते ३१ ऑगस्टपर्यंत एकूण ४८६.२ मिमी पावसाची नोंद आहे. आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली, असे म्हणता येईल. मात्र या महिन्यात पावसाचे दिवस कमी आहेत. चिकलठाणा परिसरात फक्त १७.३ मिमी पावसाची नोंद झाली.
……….
ढोलताशांचा गजर आणि पाऊस
ढोलताशांच्या गजरात व गुलालाची उधळण करत भक्तांनी सकाळपासूनच बाप्पांचे जल्लोषात स्वागत केले. दुपारी ३ वाजेनंतर पावसानेही जोरदार हजेरी लावली.१५ ऑगस्टनंतर पाऊस गायब झाल्यामुळे खरीप पिकांची चिंता वाढली होती. पण, गणपती बाप्पा आपल्यासोबत रुसलेल्या वरुणराजालाही घेऊन आल्याने भक्तांचा आनंद द्विगुणित झाला. रात्री ८.३० वाजेपर्यंत ४१.१ मिमी पाऊस पडल्याची नाेंद एमजीएम वेधशाळेत झाली आहे. यापूर्वी ४ ऑगस्टला ४७.५ मिमी तर १५ ऑगस्ट रोजी १०.५ मिमी पाऊस पडला होता. गणेशोत्सवाच्या काळात दहाही दिवस कमीअधिक फरकाने पाऊस पडण्याचा आनंद हवामान खात्याने वर्तवला आहे. तर, ग्रामीण भागातही पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे.