बिबट सफारी रद्द,अजित पवारांना धक्का…वाचा

विश्व भारत ऑनलाईन :

बारामतीमधील प्रस्तावित असलेली बिबट सफारी अखेर शिंदे सरकारने रद्द केली आहे. ही बिबट सफारी आता जुन्नरला होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यामुळे विरोधी पक्षनेते आणि बारामतीचे आमदार अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचवेळी जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके आणि शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनावणे दोघेही खुश झाले आहेत.

नेमके प्रकरण काय?

जुन्नरचे तत्कालीन शिवसेना आमदार शरद सोनवणे यांच्या प्रयत्नांतून 2016 मध्ये तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जुन्नरच्या माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्राच्या जोडीला आंबेगव्हाण येथे बिबट सफारीला तत्वतः मान्यता दिली होती. मात्र, हा प्रकल्प रेंगाळला होता.

त्यानंतर 2019 साली सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील अर्थमंत्री अजित पवार यांनी आंबेगव्हाणमधील प्रस्तावित बिबट सफारीऐवजी बारामती तालुक्यातील गाडीखेल येथील बिबट सफारीसाठी 60 कोटी निधीची तरतूद केली. सुरुवातीला बिबट सफारी आणि दुसऱ्या टप्प्यात टायगर सफारी असे नियोजन करण्यात आले. यासाठी गाडीखेल येथील 100 हेक्टर जागाही निश्चित केली.

अजित पवार यांच्या या निर्णयामुळे जुन्नरवासियांमध्ये रोष निर्माण झाला होता. या निर्णयावर जुन्नरच्या आजी-माजी आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. शरद सोनवणे यांनी चार दिवस उपोषणही केले. तर बारामतीला हलवलेली बिबट्या सफारी पुन्हा जुन्नरला आणा, अशी आग्रही मागणी करत आमदार अतुल बेनके यांनी अधिवेशनामध्ये आवाज उठवला होता. त्यामुळे बारामती विरुद्ध जुन्नर असा संघर्ष तीव्र झाला होता.

अखेरीस तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांनी जुन्नरलादेखील सफारी करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार जुन्नरच्या जागेचे सर्वेक्षणही सुरु झाले. मात्र आता सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने पुन्हा एकदा निर्णय घेऊन बारामतीमधील बिबट सफारी रद्द केली आहे.

About विश्व भारत

Check Also

मतदानाचा ग्रामीण भागात उत्साह : शहरवासी उदासीनच

मतदान केंद्रात तोडफोड, काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड तसेच प्रतिस्पर्धी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये संघर्षाच्या …

कामठी-मौदा में BJP और कांग्रेस को 50%-50% मतदान

कामठी-मौदा में BJP और कांग्रेस को 50%-50% मतदान   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *