Breaking News

पोलिसांचे वेतन दीडपट वाढणार… वाचा सविस्तर

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
गडचिरोलीसारख्या नक्षल भागात पोलिसांच्या दीडपट वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र, त्यासंदर्भातील आदेश देण्यात आले असून, येत्या सोमवारपर्यंत त्याचा शासन आदेश गडचिरोलीत पोहोचेल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोलीत केले.

Advertisements

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी आज (शनिवार) जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीत गडचिरोलीतील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला खा. अशोक नेते, आ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, आ. धर्मरावबाबा आत्राम, आ. अभिजित वंजारी, जिल्हाधिकारी, विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक, मुख्य वनसंरक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, इतर अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Advertisements

याशिवाय “गडचिरोली येथील मेडिकल कॉलेज तसेच विद्यापीठाच्या उपकेंद्राला लागणार्‍या जागचे अधिग्रहण करण्याचे आदेश दिले आहेत. सिंचनाच्या संदर्भात लोकप्रतिनिधींनी काही प्रश्न मांडले. तीन बॅरेजच्या कामाला गती देण्यासाठी डिझाईन तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याला लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. गडचिरोलीतील रस्त्यांच्या प्रलंबित कामांना गती देण्यात येईल. रूग्णांना वारंवार चंद्रपूरला जावे लागू नये, म्हणून गडचिरोलीत एमआरआय मशीन लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विकासाच्या संदर्भात सर्व अधिकार्‍यांना सूचना केल्या आहेत. गडचिरोलीचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येतील. मंत्रालय स्तरावर जे प्रश्न आहेत, त्यासंदर्भात लवकरच मंत्रालयात एक बैठक घेण्यात येईल.”, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

5 जिल्हाधिकऱ्यांची ‘ईडी’कडून चौकशी

पाच जिल्हाधिकाऱ्यांची सक्तवसुली संचालनालयापुढे (ईडी) चौकशी झाली. अवैध वाळू उपसा प्रकरणात चौकशी झाली आहे. यात …

नरेंद्र मोदी विचारमंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशीभूषण देसाई यांचा हजारो कार्यकर्त्यांसह हिंदु महासभा पक्षात प्रवेश

नरेंद्र मोदी विचारमंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशीभूषण देसाई यांचा हजारो कार्यकर्त्यांसह हिंदु महासभा पक्षात प्रवेश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *