Breaking News

जेवताना, आडवे पडताना पाठदुखी तीव्र… असू शकतात कॅन्सरची लक्षणे… वाचा

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
(Pancreatic Cancer) स्वादुपिंड किंवा अग्नाशयाचा कर्करोग हा जगभरातील बारावा सर्वात सामान्य कॅन्सर आहे. इतर प्रकारच्या कर्करोगांप्रमाणेच स्वादुपिंडाचा कर्करोग हा स्वादुपिंडातील पेशींची असामान्य वाढ झाल्याने होतो. स्वादुपिंड ही एक लहान ग्रंथी किंवा अवयव असून जी पोटाच्या लिव्हरच्या खालच्या भागात असते. यातून पचनास (digestion) मदत करणारे पदार्थ किंवा एन्झाईम तयार करण्यास मदत करते. तसेच रक्तप्रवाहात साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे हार्मोन्स सोडण्यासही मदत करते. स्वादुपिंडाचा कॅन्सर प्राणघातक ठरू शकतो. शक्य तितक्या लवकर निदान लावून त्वरित उपचार सुरू करणे खूप महत्वाचे आहे.

Advertisements

स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे किती प्रकार आहेत?

Advertisements

स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे दोन मोठ्या भागांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते, जे एक्सोक्राइन स्वादुपिंडाचे कर्करोग आहेत. ज्यामध्ये एडेनोकार्सिनोमा आणि न्यूरोएंडोक्राइन स्वादुपिंडाचा कॅन्सर असा समावेश आहे. एडेनोकार्सिनोमा हा स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे, तर न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर हा कमी सामान्य प्रकार आहे. इमेजिंग चाचण्या स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान करण्यात मदत करू शकतात. परंतु, अचूक निदानासाठी डॉक्टर ट्यूमर टिश्यूचा नमुना किंवा बायोप्सी करू शकतात.

स्वादुपिंडाचा कॅन्सर किती भयंकर?

स्वादुपिंडाचा कॅन्सर हा खूप गंभीर आहे.कारण तो शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतो. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, स्वादुपिंडाचा कॅन्सर बहुतेकदा प्रथम पोट आणि लिव्हरमध्ये पसरतो, नंतर तो हळूहळू फुफ्फुसे, हाडे, मेंदू आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतो. जेव्हा हा कॅन्सर सर्वत्र पसरतो तेव्हा रुग्णाला वाचवणे खूप कठीण असते.

कॅन्सर कुठे पसरला आहे त्यानुसार लक्षणे बदलू शकतात व वेगवेगळी दिसू शकतात. कॅन्सर रिसर्च यूकेच्या मते, ट्यूमर शरीरात पसरला आहे याचं मुख्य लक्षण म्हणजे प्रचंड वेदना. शरीराचा सांगाडा बनवणाऱ्या जिवंत ऊतींच्या तुटण्यामुळे ही वेदना सतत जाणवू शकते. या कर्करोगाचा सर्वाधिक परिणाम पाठीवर होतो. जेवताना आणि आडवे पडताना ही पाठदुखी अधिक तीव्र होऊ शकते. याशिवाय हाडे कमकुवत होणे, रक्तातील कॅल्शियमची पातळी (हायपरकॅल्शियम) वाढणे, रक्तातील पेशींची पातळी कमी होणे ही लक्षणे स्वादुपिंडाचा कॅन्सर झाल्यास दिसून येतात.

स्वादुपिंडाचा कर्करोग काही सामान्य लक्षणांद्वारे ओळखला जाऊ शकतो जी बहुतेकदा सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात दिसून येतात.

याकडे द्या लक्ष…

✳️पोटाच्या वरच्या भागात वेदना ज्या पाठीपर्यंत पसरतात
✳️कावीळ
✳️थकवा
✳️भूक न लागणे
✳️हलक्या रंगाचा शौच
✳️गडद रंगाची लघवी
✳️वजन कमी होणे
✳️शरीरात रक्ताच्या गुठळ्या होणे
✳️त्वचेला खाज सुटणे
✳️अनियंत्रित मधुमेह
✳️मळमळ आणि उलटी

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कमलिनी जड़ की सब्जी का मटन से अच्छा लजीज स्वाद : चखकर मनपसंद लडका रिश्ता पक्का करेगा!

कमलिनी जड़ की सब्जी का मटन से अच्छा लजीज स्वाद : चखकर मनपसंद लडका रिश्ता …

उन्हाळ्यात थंडगार बर्फाचे पाणी पित असाल तर..!

शरीरातील पाण्याची पातळी राखणे हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे तज्ज्ञ रोज १० ते १२ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *