Breaking News

रावणाचे पूर्वज राहतात भारतात… आजही करतात रावणाची पूजा… वाचा

विश्व भारत ऑनलाईन :
दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून सीतेला मुक्त केले होते. आणि तेव्हापासून दसऱ्याच्या दिवशी सर्वत्र रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. पण तुम्हाला हे जाणून थोडं आश्चर्य वाटेल की, रावणाचा पुतळा जाळला जात नाही, तर देशातील काही गावात पूजा केली जाते.

रावणाचे जन्मस्थान ?

रावणाचा जन्म भारतातील उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील बिसरख गावात झाला. जे राजधानी दिल्लीपासून अवघ्या 40 किमी अंतरावर आहे. रावण हा आपला पूर्वज असल्याचे येथील लोक मानतात. एवढेच नाही तर येथे दसऱ्याच्या दिवशी रावणाचं दहनही केले जात नाही. आणि या गावात दसऱ्याच्या दिवशी कोणताही सण साजरा केला जात नाही. या गावात दशनानाचे मंदिर असून येथील लोकही त्याची पूजा करतात.

शिवलिंगाची स्थापना

रावणाचे आजोबा पुलस्त यांनी बिसरख गावात रावणाच्या मंदिरात शिवलिंगाची स्थापना केल्याचे कळते. जिथे रावणाचे वडील आणि रावणानेही शिवलिंगासमोर तपश्चर्या केल्याचे समोर आले आहे.बिसरख गावाच्या मध्यभागी बांधलेले रावणाचे मंदिर आकर्षणाचे केंद्र आहे. हे मंदिर भोलेनाथाला समर्पित आहे.

रावणाचे शिक्षण

बिसरख गाव हे अष्टकोनी शिवलिंगाची स्थापना करणारे देशातील पहिले स्थान आहे. याच ठिकाणी रावणाचे शिक्षण झाले. आणि त्याचा भाऊ, बहीण कुंभकरण, शूर्पणखा आणि विभीषण यांचा जन्मही येथे झाला. कारण रावणाचे वडील विश्व ऋषी यांचे गाव बिसराख होते.

रावण पुतळा दहणाला विरोध

देशातील बहुतांश भागात दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन केले जाते. मात्र बिसरख गावात रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जात नाही. कारण हे आहे की काही वर्षापूर्वी या गावातील लोकांनी रावणाचा पुतळा जाळला होता. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याने गावात रावणाचे दहन बंद करण्यात आले. तसेच दसरा न साजरा करण्याबाबत येथील लोक अनेक कथा सांगतात.

About विश्व भारत

Check Also

अयोध्या में 6 प्रवेश द्वारों को पर्यटन केंद्र बनाएगी योगी सरकार

अयोध्या में 6 प्रवेश द्वारों को पर्यटन केंद्र बनाएगी योगी सरकार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

मस्तक पर तिलक धारण का आध्यात्मिक एवं धार्मिक महत्व

मस्तक पर तिलक धारण का आध्यात्मिक एवं धार्मिक महत्व   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *