कलाकारांना मिळेल आर्थिक मदत-सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार

विश्व भारत ऑनलाईन :
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. त्यामुळे चित्रीकरण बंद करण्यात आले होते. केवळ चित्रिकरणाच्या उत्पन्नावर अवलंबून असणाऱ्या कलाकारांना अनेक समस्यांना सामारे जावे लागलं. याच कलाकारांसाठी राज्य सरकारने मदतीची घोषणा केली होती. या कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात येणारी मदतीची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

निवड पद्धतीत बदल

एकल कलाकारांची निवड पद्धती व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे याबरोबर वार्षिक उत्पन्न रुपये मर्यादाही 48 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये कमाल इतकी मर्यादा करण्यात आली आहे. समूह लोकपथकांचे मालक /निर्माते यांनी एकरकमी विशेष अनुदान पॅकेज मिळविताना सादर करण्याच्या कागदपत्रे व निवड पद्धतीत बदल करण्यात आले असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

याशिवाय समूह लोकपथकांचे मालक/निर्माते यांनी एकरकमी विशेष कोविड अनुदान पॅकेज मिळविताना सादर करावयाच्या कागदपत्रे आणि निवडपद्धतीमध्ये बदल करण्यात आला आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत परिपत्रक काढले असून सदर परिपत्रक www.maharashtra.gov.in या संकेस्थळावर उपलब्ध आहे.

About विश्व भारत

Check Also

मल्लिका शेरावतच्या बेडरूममध्ये रात्री 12 वाजता घुसला अभिनेता : वाचा

बॉलीवूडमध्ये एकेकाळी मल्टीस्टारर विनोदी चित्रपटांचा ट्रेंड होता. अभिनेत्री मल्लिका शेरावतने अशा बऱ्याच मल्टीस्टारर कॉमेडी चित्रपटांत …

अभिनेत्री आलिया भट्टने सहा तास का रोखली लघवी? वाचा

अभिनेत्री आलिया भट्टचा नवीन चित्रपट ‘जिगरा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि या चित्रपटाचे सध्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *