Breaking News

अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, पण संधीही द्यावी ; उपमुख्यमंत्री फडणवीस

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरोग्य विभागातील कर्मचारी अनुपस्थित असल्यासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी आरोग्य विभागात अकाऊंटिबिलिटीची गरजेची आहे. सरकार बदलले आहे. त्यामुळे अकाऊंटिबिलिटी ठरली पाहिजे. मात्र प्रत्येक वेळी मोठी कारवाई गरजेची नाही, कधी कधी वॅार्निंग द्यायला हवी. पण जे कामावरच येत नाहीत, अशांवर कठोर कारवाई व्हायला हवी. शिस्त लागण्यासाठी अशी कारवाई आवश्‍यक आहे. मेयो हॉस्पिटलमध्ये (इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय) शिबिराला भेट देण्याकरिता आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

Advertisements

मागच्या काळात आमच्या सरकारमध्ये मोतीबिंदू फ्री महाराष्ट्र अभियान राबवत 17लाख ॲापरेशन केले होते. आता पुन्हा एकदा आम्ही मोतीबिंदू फ्री महाराष्ट्र हे कॅम्पेन सुरू केले आहे. नागपूर दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात यापूर्वीच 4000 लोकांची चाचणी केली होती, त्यांपैकी 500 लोकांचे ॲापरेशन आज करणार आहोत. सगळ्या मतदारसंघांत अशाप्रकारे कॅम्प घेण्यात येणार आहेत आणि तेथील लोकांना या आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहेत, असे फडणवीसांनी सांगितले.

Advertisements

आदिपुरुष या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून सध्या वाद सुरू आहे. भाजपा नेते राम कदम यांनी चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असे म्हटले आहे. तर मनसेने समर्थन केले आहे. यावर आदिपुरुष या चित्रपटाबद्दल मी आता काही बोलणार नाही, असे म्हणत या प्रश्नाला बगल दिली.

राज्यातील रेशन कार्ड (पिवळे) धारकांना 100 रुपयांत धान्य, तेल आदी साहित्याची किट देण्यात येणार आहे. याच्या निविदेमध्ये घोळ झाल्याचा आरोप विरोधक करीत आहेत, याबाबत बोलताना शंका असलेल्यांनी फुड कीट निविदा प्रक्रिया तपासून घ्यावी, असे आवाहन केले. ओपन टेंडर पद्धतीने एनसीडीएक्सच्या माध्यमातून स्पर्धेतून प्रक्रिया केली आहे. कोणाचीही तपासाला हरकत नाही. पण घोटाळे करायची सवय असलेले असे आरोप करतात असा टोला हाणला. मेयो रुग्णालय परिसरात असलेली मेडिकल बिल्डिंग नवीन करणार. सोबतच नवे होस्टेल बांधण्याबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. मेडिकल रुग्णालयातील गरजेची कामे प्राथमिकतेने करणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

चित्रपटाची ऑफर नाकारुन झाल्या उपजिल्हाधिकारी

ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील अधिकारी आहेत. त्यांना डॉक्टर व्हायचे होते. त्यांनी राजकारणाच्या क्षेत्रातही प्रवेश केला. …

मतदान में लापरवाही : अधिकारी सहित 3 निलंबित

मतदान में लापरवाही : पीठासीन अधिकारी सहित 3 निलंबित टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट लोकसभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *