Breaking News

यवतमाळ-मुंबई बसला आग : नाशिकमधील घटना : चिमकुल्यासह 12 जणांचा बळी

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
नाशिकमध्ये एका खाजगी बसने अपघातानंतर पेट घेतला. यात एकूण 12 प्रवाशांचा बळी गेल्याचे समोर आले आहे. औरंगाबाद रोडवरील कैलास नगर भागात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Advertisements

माहितीनुसार, चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळवरून मुंबईला येत होती. पहाटे साडे पाच वाजता या बसला अपघात झाला. बसने पेट घेतल्याने एकूण 12 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. या 12 जणांमध्ये एका चिमुरड्याचाही समावेश आहे.

Advertisements

अग्निशमक दलाकडून बसला लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला. यात बस जळून खाक झाली. बसमध्ये आणखी काही प्रवाशी असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

महाराष्ट्र, गुजरातसह ७ राज्यातील रेल्वे रद्द

जर तुम्ही जून महिन्यात कुठे बाहेर फिरण्याचा किंवा प्रवासाचा बेत आखत असाल, तर ही बातमी …

राज्यात विजेचा लपंडाव : कंत्राटदार संप पुकारणार!

महावितरणने मागील तीन महिन्यांतील देखभाल-दुरुस्तीच्या कामांपोटी राज्यभरातील कंत्राटदारांचे सुमारे ३०० कोटी रुपयांची देयके अदा केली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *