यज्ञ सुरू आणि भोलेनाथच्या मूर्तीवर अवतरले नागराज

विश्व भारत ऑनलाईन :
भगवान भोलेनाथचे कोट्यवधी भाविक आहेत. भाविकांनी श्रद्धेने भोलेनाथची पूजा केल्यास त्यांना दर्शन मिळते.

असाच प्रसंग नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात सोमवारी समोर आला. तेथे कालाष्टमीनिमित्त भाविकांच्या वतीने यज्ञ सुरू होता. हा यज्ञ सुरू असताना एक घटना घडली. चक्क भगवान भोले शंकराच्या मूर्तीवर नागराज अवतरले अन् या नागराजांनी भगवान शंकराच्या गळ्याला वेडा देऊन तेथे ठाण मांडले.

घटनेबद्दल समजताच यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली. हे सर्व पाहिल्यानंतर भाविकांनी कुठलाही आरडाओरडा न करता सर्पमित्राला याबाबत माहिती दिली.

सर्पमित्र दीपक सोनवणे यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन या नागराजाला सुरक्षित रित्या जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. दरम्यान या घटनेची चर्चा परिसरात होताच नागरिकांनी मंदिराच्या दिशेने धाव घेऊन दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

About विश्व भारत

Check Also

अयोध्या में 6 प्रवेश द्वारों को पर्यटन केंद्र बनाएगी योगी सरकार

अयोध्या में 6 प्रवेश द्वारों को पर्यटन केंद्र बनाएगी योगी सरकार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

मस्तक पर तिलक धारण का आध्यात्मिक एवं धार्मिक महत्व

मस्तक पर तिलक धारण का आध्यात्मिक एवं धार्मिक महत्व   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *