विश्व भारत ऑनलाईन :
बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यातील वाद आता चिघळला आहे. बच्चू कडू यांनी रवी राणांना प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. याप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर अमरावती शहरातील राजापेठ ठाण्यात भारतीय दंडविधानातील कलम ५०१ अंतर्गत बच्चू कडू यांच्यावर अब्रूनुकसानीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांच्या विरोधात वक्तव्य करताना बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्या पत्नी आणि आईचा अपमान केला असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत महिला मुक्ती आघाडीच्या वतीने बच्चू कडू यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली. या तक्रारीच्या आकारावर पोलिसांनी आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.