विश्व भारत ऑनलाईन :
केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा चार आण्यावरील फोटो व्हायरल झाल्यानंतर आता यावर महत्वाच्या प्रतिक्रीया आल्या आहेत. राणेंची किंमत चार आण्याएवढीच आहे, असे टीकास्त्र शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. ”या फोटोबाबत माहित नाही पण ते आमचे मित्र त्यांचा फोटो असा चलनात आला तर वाईट काय आहे? ” अशी मिश्किल टीका छगन भुजबळ यांनी केली.
25 पैशांच्या नाण्यावर राणेंचा फोटो
भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काही नेटकऱ्यांनी ट्रोल केले. 25 पैशांच्या नाण्यावर नारायण राणे यांचा फोटो एडिट करून, संबंधित नाणे फायनल करा, अशी मागणी नेटकऱ्यांनी केली. या प्रकारानंतर भाजप मात्र आक्रमक झाले.