Breaking News

शिंदे गटाचे आमदार नाराज, शेतकरी त्रस्त : कंत्राटदारांना मोबदला मिळेना, विकासकामे रेंगाळण्याची भीती

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदार मंत्रिमंडळाच्या प्रतीक्षेत आहेत. “मंत्रिमंडळाच्या विस्ताराला उशीर होत असल्यानं आमदारांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. ही अस्वस्थता आता उघडपणे बाहेर पडू लागली आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी सर्व आमदार गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत,” अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Advertisements

मुख्यमंत्री शिंदेंची दमछाक

Advertisements

बडनेऱ्याचे आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात वाद सुरु आहे. तरी, जळगाव जिल्ह्यात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्ह्यातील अन्य आमदारांमध्ये मतभेद आहेत. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चांगलीच दमछाक होत आहे.

तिकडे भाजपा आमदार गिरीश महाजनांनी एक हजार कोटींचे काम रद्द केल्याने सर्वपक्षीय आमदारांमध्ये नाराजी असल्याचेही कळते. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला होता. या विस्ताराला तीन महिने उलटुनही अद्याप दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नाराज आमदारांची मनधरणी करण्यासाठी सरकारकडून हालचालींना वेग आला आहे.

शेतकरी,कंत्राटदार नाराज

शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पीक नुकसानीचे पैसे मिळाले आहेत. तरीही, अनेक शेतकरी वंचित आहेत. तर, अनेक शासकीय कंत्राटदारांना कामाचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात विकास कामांवर परिणाम होऊ शकतो. अनेक कंत्राटदारांना या सरकारकडून अपेक्षा आहे. मात्र, ऐन दिवाळीतही कंत्राटदारांना पाहिजे तसे काम आणि मोबदला न मिळाल्याने नाराजी आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

भेड़-बकरियां शेर से लड सकती है? CM शिंदे का उद्धव ठाकरे पर पलटवार

  टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट मुंबई ।महाराष्ट्र के मुख्यमंत्री और शिवसेना के नेता एकनाथ …

विदर्भात किती दिवस असेल पाऊस?

आगामी चार ते पाच दिवसात राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यातील काही जिह्यांना यलो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *