Breaking News

नागपुरात अपहरण? ‘मित्रासोबत जात आहे’ असे सांगून मुलगा गेला घरातून निघून

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
‘मित्रासोबत जात आहे’ असा मेसेज आईच्या मोबाईलवर टाकून बँगेत कपडे घेऊन मुलगा घरून निघून गेल्याची घटना नागपुरात घडली. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.आई वडिलांच्या जीवाला घोर लागला आहे. आई वडिलांनी मित्र व नातेवाईकांकडे शोध घेतला. परंतु आढळून न आल्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलाचे वय 17 वर्ष 9 महिने आहे. मुलगा सोबत मोबाईलही घेऊन गेला आहे.

Advertisements

पोलिसांनी मुलाशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगा मोबाईल उचलत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलाचे आई वडील मुळचे छत्तीसगढचे आहे. पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रेस केले असता ते गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेड्याच्या समोर दाखवित होते. रिंग जाऊनही मुलगा फोन उचलत नसल्याने घरच्यांची चिंता वाढलीय. तर मुलगा तसा मोठा असल्याने अपहरणाची शक्यता कमी असल्याचे पोलिसांनी सांगितले. येथे नेटवर्क कव्हरेज नाही. नंतर फोन करतो असा मेसेजही मुलाने आईच्या मोबाईलवर टाकला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

शिवसेनेच्या महिला नेत्याची पतीकडून हत्या : कारण वाचा

चारित्र्यावर संशय घेत संशयाचे भूत डोक्यात शिरल्याने पतीने मध्यरात्री पत्नीची चाकू भोसकून हत्या केल्याची थरारक …

आरोग्य अधिकाऱ्यांने मागितली लाच

धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जळगावच्या तत्कालीन आरोग्य अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोग्य विभागासाठी भाडेतत्त्वावरील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *