विश्व भारत ऑनलाईन :
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि काँग्रेसला आश्चर्याचा धक्का देत भारतीय चलनी नोटांवर हिंदू देवी-देवता गणपती आणि लक्ष्मीचे फोटो लावण्याचे आवाहन केले. यावर अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनीही माता लक्ष्मी आणि गणेशजीची फोटो असायला हवी, अशी मागणी केली आहे.
जगातला सगळ्यात मोठा मुस्लीम देश इंडोनेशियाच्या चलनावर गणेशजीचा फोटो असतो. ते असे करू शकतात,तर भारतात हे का होऊ शकत नाही.
इंडोनेशियाच्या लोकसंख्येत 85 टक्के जनता मुस्लीम आहे आणि दोन टक्के जनता हिंदू आहे तरीही त्यांच्या चलनी नोटेवर गणपतीचं चित्र आहे.
तर, भारताला स्वतंत्र मिळवून देण्यात महात्मा गांधी यांचा वाटा होता. मात्र, त्यांच्यासोबत सुभाषचंद्र बोस, विनायक दामोदर सावरकर आणि अन्य थोर व्यक्तींचाही सहभाग होता. हे विसरता येणार नाही. त्यामुळे महात्मा गांधी यांच्यासोबत अन्य थोर व्यक्तींचा फोटो नोटेवर द्यावा, अशी मागणी कारेमोरे यांनी केली आहे.