Breaking News

दररोज उठल्यावर तुळशीची पाने खा…अनेक आजार जातील पळून!

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
तुळशीची पाने चाऊन खाल्यास डायबिटीससोबत 5 मोठे आजारही दूर होतात. वाचा फायदे काय आहेत…

Advertisements

डायबिटीस नियंत्रणात…

Advertisements

तुळशीची पानांत कॅरियोफिलीन, मिथाइल युजेनॉल आणि युजेनॉल सारखे घटक असतात. तुळशीच्या पानांमुळे स्वादुपिंडाच्या बीटा पेशी योग्य प्रकारे काम करतात. तुळशीच्या पाने शरीरात इन्सुलिन सम प्रमाणात तयार करतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित रहाते व डायबिटीस होण्याचा धोका कमी होतो.

डोकेदुखी जाईल पळून…

तुळशीची पाने इम्युनिटी वाढवण्याचे काम करतात. ज्या लोकांना थंडी वाजणे, डोकेदुखी आणि सायनस सारखे आजार असतात त्यांच्यासाठी तुळशीची पाने हा एक रामबाण उपाय आहे. यासाठी आधी तुळशीच्या पानांना गरम पाण्यात उकळून घ्या. त्यानंतर त्या पाण्याला गाळून कोमट करत ठेवा. त्यानंतर ते पाणी घोटा घोटाने प्या. त्यामुळे तुम्हाला आराम पडेल.

तणावापासून सुटका…

अभ्यासाच्या अहवालानुसार, तुळशीमध्ये मानसिक तणाव कमी करणारे कॉर्टिसॉल आढळून येते. जे लोकं तणावाचा सामना करीत आहेत, त्यांच्यासाठीसुद्धा तुळशीच्या पानांचे सेवन फायदेशीर आहे. तुम्ही रोज रिकाम्या पोटी 14 तुळशीची पाने चघळून खायला सुरुवात करा. याचा फायदा तुम्हाला लवकरचं दिसेल.

घशा खवखवीपासून देईल आराम…

ऋतु बदल्यानंतर घसा खवखवणे हे अगदी सामान्य मानले जाते. घश्याच्या खवखवीपासून लवकर आराम मिळवण्यासाठी तुळशीच्या पानांना उकळून घ्या. नंतर त्या पाण्याला चांगले गाळून घ्या आणि हे पाणी हळू हळू प्या. त्यामुळे तुमच्या गळ्याची खवखव व त्यामुळे घसा दुखण्यापासून आराम मिळतो.

तोंडाच्या दुर्गंधी पासून सुटका…

श्वास व तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुळशीची पाने फायदेशीर ठरतात. तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची काही पाने तोडून ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आणि त्यांना थोडे थोडे करुन चघळा. तुमच्या तोंडाची दुर्गंधी दूर होईल.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

शारीरिक ताकत बढाने के लिए इमली के बीज का पावडर के उपयोग के रामबाण फायदे

शारीरिक ताकत बढाने के लिए इमली के बीज का पावडर के उपयोग के रामबाण फायदे …

लैंगिक लकबा (पेनिस पिरालेसेस) नपुंसकता सहित अन्य असाध्य गुप्तरोग समस्या निवारण के लिए रामबाण वनौषधीय है अतिवला का पौधा

लैंगिक लकबा (पेनिस पिरालेसेस) नपुंसकता सहित अन्य असाध्य गुप्तरोग समस्या निवारण के लिए रामबाण वनौषधीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *