समाजातील शेवटच्या माणसाशी संबंध असलेल्या महसूली कायद्यात सुधारणा आवश्यक आहे त्यादृष्टीने काम करणार, असे नवनिर्वाचित महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राहुल गांधी यांच्या परभणी दौ-यावर टीका केली बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. मला महसूल खात्याची जबाबदारी दिली आहे, संपूर्ण महसुली कायद्यांना शेतकरी शेतमजुरांना समाजातील शेवटच्या माणसाशी संबंध असलेल्या महसूल खात्यात कायद्यात सुधारणा आवश्यक आहे त्यादृष्टीने काम करणार आहे. आजछोट्या छोट्या कारणामुळे विकास प्रकल्प थांबले आहे. त्याला पुढे नेण्याचे काम करू, ८६ हजार हेक्टर झुडपी जंगल नसताना त्याच्या नोंदी केल्या आहेत. त्याप्रमाणे उच्च न्यायालयात ते प्रकरण सुरू आहे. लवकर झुडपी जंगल मुक्त होईल असेही बावनकुळे म्हणाले.
विदर्भातील झुडपी जंगल जमिनीमुळे विकास प्रकल्प थांबले आहे. उच्च न्याालयात महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही बाजू मांडू. रेती माफिया बंद कसे होईल यासाठी प्रयत्न करणार आहे असेही बावनकुळे म्हणाले देशात काय सुलभीकरण झाले हे जनतेला घरी बसून पाहता येईल. जनतेची फरपट थांबेल असा बदल करून जनतेला दिलासा देऊ. महसूल खात्याकडून होणारा त्रास थांबेल असेही बावनकुळे म्हणाले.महसूल प्रशासनातील रेती माफिया पूर्णपणे नाहीसा करायचा आहे, असेही म्हणाले.