Breaking News

धनंजय मुंडे यांनी केला बोगस पीक विमा घोटाळा

एकाच्या जमिनीवर दुसऱ्यानेच पीक विमा काढल्याचे प्रकरण अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधानसभेत दिले.

 

विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना फडणवीस बोलत होते. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना माजी कृषीमंत्र्यांच्या आशीर्वादाने बीड जिल्ह्यातील विशेषत: परळीमधील लोकांनी बंजारा समाजाच्या जमिनींवर पीक विमा घेतला आणि कोट्यवधी रुपये हडपल्याचा आरोप केला होता. याबाबत फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांचा १ रुपयात विमा उतरवला जातो आणि उर्वरित रक्कम करदात्यांच्या पैशातून भरली जाते. पण, कोणीही कोणाच्याही जमिनीवर विमा काढत असेल आणि विम्याची रक्कम अशाप्रकारे बोगस पीक विमा धारकांकडे जात असेल तर ते योग्य नाही. याची सखोल चौकशी केली जाईल.

 

अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत भाजपचे धस यांनी बीड, परभणी आणि धाराशीव जिल्ह्यातील बोगस पीक विमा प्रकरणावरून सरकारलाच घरचा अहेर दिला. बोगस विम्याचा परळी पॅटर्न असेही नावही त्यांनी दिले. बंजारा समाजाच्या रामापूर तांडा येथे तब्बल ४ हजार हेक्टरचा विमा काढण्यात आला, असे सांगून तांड्याचे एवढे मोठे क्षेत्रफळ असते काय, असा सवाल त्यांनी केला.

धस यांचा रोख कुणाकडे?

सुरेश धस यांनी कोणत्याही कृषीमंत्र्यांचे नाव घेतले नाही. त्यामुळे माजी कृषी मंत्री दादा भुसे यांनी कृषीमंत्र्याचे नाव घ्या, जेणेकरून गोंधळ होणार नाही, अशी विनंती केली. पण धस यांनी नोटीस दिली नाही. त्यामुळे नाव घेणार नसल्याचे सांगितले. परंतु बोगस पीक विम्याच्या ज्या प्रकरणांचा त्यांनी उल्लेख केला, ती २०२३ आणि २०२४ ची आहेत. हा कार्यकाळ बघता घस यांचा रोख मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे असल्याचे दिसून येते.

About विश्व भारत

Check Also

धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढण्याची घोषणा

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येपासून गाजत असलेला बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्त्येचा मुद्दा अधिवेशनाच्या …

मध्य प्रदेश सरकार द्धारा भीख मागने पर पाबंदी का बड़ा फैसला

मध्य प्रदेश सरकार द्धारा भीख मागने पर पाबंदी का बड़ा फैसला टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *