Breaking News

धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढण्याची घोषणा

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येपासून गाजत असलेला बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्त्येचा मुद्दा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या गावाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या भेटीने चर्चेत आला. पवार या गावाला भेट देऊन आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार शनिवारी या गावात गेले.मात्र तेथील ग्रामस्थांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात घोषणा दिल्या.

 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्येचा मुद्दा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गाजला. दोन्ही सभागृहातील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी या क्रूर हत्त्येचा निषेध करीत दोषींवर कडक कारवाीची मागणी केली. सरकारच्यावतीने या मुद्याला सविस्तर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कोणालाही पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही कालच सभागृहात दिली. या प्रकरणामुळे अडचणीत आलेले महायुतीचे मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी झाली. त्यांचा सहकारी वाल्मिक कराड याला अटक करावी ही मागणीही विरोधकांनी लावून धरली होती. पण मुख्यमंत्र्यांनी त्याला त्यांच्या उत्तरात याला बगल दिली.

 

शनिवारी शरद पवार यांनी मस्साजोगला जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केल्याने हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार अधिवेशन सोडून मस्साजोगला गेले. तेथे त्यांनी दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले. मात्र यावेळी ग्रामस्थांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. त्यासाठी कारणीभूत ठरले ते धनंजय मुंडे. या प्रकरणी आरोप असलेले वाल्मिक कराड हा मुंडे यांचा कार्यकर्ता आहे.पण त्याच्यावर कारवाई झाली नाही.याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला. त्यामुळे आता या मुद्यावर राजकारण अधिक तापन्याची चिन्हे दिसू लागली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्त्येनंतर या प्रकरणावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मौन बाळगले होते हे येथे उल्लेखनीय.

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील मुख्यमंत्र्यांचा जनता दरबार देखावा! नाराज नागरिक म्हणाले, हे कसले गतिमान सरकार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृह जिल्हा असलेल्या नागपुरातील हैदराबाद हाऊस येथे शनिवारी (१७ मे रोजी) …

बहनों के लिए खुले सरकार के द्वार : CM मोहन यादव

बहनों के लिए खुले सरकार के द्वार : CM मोहन यादव टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *