आरोग्य कर्मचाऱ्यांची बैठक सुरू होती. बैठक सुरू असतानाच अचानक आरोग्य केंद्रात चक्क कोब्रा साप निघाल्याने एकच गोंधळ उडाला. हा अंगावर काटा आणणारा प्रकार घडला बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला.
आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणारी उपकेंद्रातील कर्मचारी यांची मासिक बैठकीचे आयोजन आज दुपारी करण्यात आले होते. बैठकीचे कामकाज सुरू असताना अचानक प्राथमिक आरोग्य केंद्रातील बैठक सुरू असलेल्या हॉलमध्ये भलामोठा साप निघाल्याने कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.
विश्वभारत News Website