Breaking News

३१ वर्षीय तहसीलदाराचा भीषण अपघातात मृत्यू : कारने चिरडले झाडाला

Advertisements

लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ आज सकाळी झालेल्या भीषण कार अपघातात केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Advertisements

राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत होते. यावेळी त्यांची गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाले. अपघाताची तीव्रता इतकी जबरदस्त होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. राकेश गिड्डे हे कार मध्ये एकटेच होते. गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने गाडी दीडशे फुट घासत गेल्याचे दिसून आले. गाडी एका झाडाला धडकली होती. ते झाडही तुटले आणि गाडी पुढे गेली.

Advertisements

घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनातून मृतदेह बाहेर काढून तो उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. या अपघाताबाबत अधिक तपास सुरू असून, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गिड्डे यांच्या निधनामुळे महसूल विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

साली बनकर लडकी की ‘सेक्सी’करतूत!

सावधान: लडकी की करतूत’साली’ बनकर बात कर रहा था ठग!   टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

हत्यारा खूनी डंपर-टिप्पर की चपेट मे 6 लोगों की दर्दनाक मौत 

हत्यारा खूनी डंपर-टिप्पर की चपेट मे 6 लोगों की दर्दनाक मौत टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *