Breaking News

चंद्रपूर : पीडब्लूडीचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात पूल बांधणीच्या कंत्राटदाराला 2 लाखाची मागणी करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता अनिल शिंदेला 2 लाखाची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.

तक्रारदार यांनी सदर पुल बांधणीचे कामे पुर्ण केलेले असुन केलेल्या पुल बांधणीच्या कामाचे निरीक्षण शिंदे यांचेकडून करण्यात आलेले होते. तक्रारदार यांनी केलेल्या संपुर्ण कामाचे अंदाजे १ कोटी रूपयाचे एकुण ४ बिले असुन सदर ४ बिलांपैकी २ बिल तयार करून मंजूर करणेकामी सार्वजनिक बांधकाम विभाग, चंद्रपूर येथे पाठविणेकरीता तसेच बिल मंजूर झाल्यानंतर उर्वरित २ बिल तयार करून मंजूरीकरीता पाठविण्याच्या कामाकरीता शिंदे यांनी २ लाख रूपये लाच रक्कमेची मागणी केली.

परंतु तकारदार यांची अनिल जगन्नाथ शिंदे, कनिष्ठ अभियंता (वर्ग २) सार्वजनीक बांधकाम उपविभाग, जिवती, ता. जिवती, जि. चंद्रपूर यांना २ लाख रूपये लाच रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने त्यांचे विरुध्द लाप्रवि कार्यालय चंद्रपूर येथे आज दि. ०१/११/२०२२ रोजी सापळा कार्यवाही दरम्यान कनिष्ठ अभियंता अनिल जगन्नाथ शिंदे, यांनी पंचासमक्ष लाचरक्कम स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. सदर कार्यवाही यशस्वी पार पाडली आहे. यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

About विश्व भारत

Check Also

वन अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी लाखोंचा व्यवहार : मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

राज्यातील वन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ निर्माण झाला असून घोडेबाजार देखील सुरू झाला …

नाबालिका के दुष्कर्मि देहदानवों को पुलिस ने किया गिरफ्तार 

नाबालिका के दुष्कर्मि देहदानवों को पुलिस ने किया गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *