Breaking News

वाघ तस्कर जाळ्यात : नागपूर व भंडारा वनविभागाची कारवाई

Advertisements

भंडारा जिल्ह्यातील नाकडोंगरी वन परिक्षेत्रातील गोबरवाही येथे वाघ नखांसह वन्य जीवांच्या विविध अवयवांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नागपूर व भंडारा वन विभागाच्या फिरते पथकांनी शनिवारी सायंकाळी संयुक्‍तपणे केली.

Advertisements

आरोपींकडून वाघाचे अवयव जप्त करण्यात आले असून, यामध्‍ये 15 वाघनखे, 3 सुळे दात, 10 जोड दात (दाढ), 5 किलो हाडांचा समावेश आहे.

Advertisements

वनविभागाच्या माहितीनुसार, संजय श्रीराम पुस्तोडे (वय 41) रा. चिखला माईन्स व रामू जयदेव ऊईके (वय 33, रां. असलपणी ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. नाकडोंगरी वन परिक्षेत्रातून वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यानुसार वन विभागाने आरोपी आणि त्‍यांच्याकडील अन्य वन्यजीवांच्या अवयव ताब्‍यात घेतले.

वन विभाग पथक दोन्ही आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवूनच होते. लगेच गोबरवाही भागात सापळा रचण्यात आला. आरोपी वन्यजीवांच्या अवयव, साहित्यासह तिथे पोहोचताच अचानक धडक देऊन मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांच्याकडून वाघनखे, दात व हाडे जप्त करण्यात आली. सुगावा लागल्यास आरोपी पळून जाण्याची किंवा त्याच्याकडील साहित्य नष्ट करण्याची शक्यता होती. यामुळे आरोपींवर पाळत ठेवण्यात आली. बनावट ग्राहकांना पाठविण्यात आले. दोन दिवस त्‍यांना चर्चेत गुंतवून ठेवले आणि शनिवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

जिल्हाधिकाऱ्यांचे छायाचित्र वापरून नागरिकांकडे पैशांची मागणी

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे छायाचित्र वापरून ‘व्हॉट्स ॲप’वर आरोपीने बनावट खाते उघडले. या खात्यावरून नागरिकांकडे …

विवाहोत्सव की शूटिंग करने नागपुर से गोटेगांव जाते समय टिप्पर से टकराई कार के परखच्चे उडे

विवाहोत्सव की शूटिंग करने नागपुर से गोटेगांव जाते समय टिप्पर से टकराई कार के परखच्चे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *