Breaking News

अभिनेत्री एंड्रिला शर्माचे 24 व्या वर्षी ब्रेन स्ट्रोकने निधन

बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्माचे ब्रेन स्ट्रोकमुळे निधन झाले.तिने वयाच्या २४ व्या वर्षी कोलकाता येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. एंड्रिलाच्या निधनाने बंगाली, बॉलिवूडसह अनेक कलाकारांमध्ये शोककळा पसरली आहे. अलीकडेच तिला कॅन्सरचे निदानही झाले होते.

अभिनेत्री एंड्रिला शर्माची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक होती. एंड्रिला १५ नोव्हेंबर रोजी अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्या. यानंतर त्या कोमात गेल्यामुळे डॉक्टरांनी व्हेंटिलेटरवर ठेवले होते. याआधी १ नोव्हेंबर रोजी तिला हद्यविकाराचा झटका आल्यानंतर तिची प्रकृती ढासळली होती. या आजारातून ती लवकर बरी होण्यासाठी कुटूंबियानी खूपच पैसा खर्च केला होता. मात्र, आज त्याची कोलकाता येथील रुग्णालयात प्राणजोत मावळली. एंड्रिलाच्या निधनाने चाहत्यांसह सर्व स्टार्संना धक्का बसला आहे.

टीव्ही शो,सोशल मीडियावर सक्रिय

एंड्रिला शर्माने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. तिने २००७ मध्ये ‘झूमर’ या टीव्ही शोमधून पहिल्यादा पदार्पण केले आहे. यानंतर तिने ‘जीवन ज्योती’, ‘जिओं काठी’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसली. तर एंड्रिलाचे सोशल मीडियावर खूपच फॅन-फॉलोव्हर्स आहेत. एंड्रिला सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो पाहायला मिळतात.

About विश्व भारत

Check Also

स्लिट ड्रेस में सैक्सी जैकलीन फर्नांडिस का जलवा

स्लिट ड्रेस में सैक्सी जैकलीन फर्नांडिस का जलवा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   मुंबई। …

दाऊद इब्राहिम बॉलीवूडला पोसायचा आणि अभिनेत्री…!

दिग्दर्शक महेश भट यांनी दिग्दर्शित केलेला ‘आशिकी’ हा सिनेमा ९० च्या दशकात चाहत्यांच्या पसंतीस पडला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *