Breaking News

डेंग्यू-मलेरियाला ठेवा लांब, मच्छरांपासून ‘हे’ तेल करेल संरक्षण

Advertisements

हिवाळा येताच डास वाढतात. यामुळे डेंग्यू-मलेरियासारखे मोठ्या आजारांचा धोका वाढतो. डासांना दूर करण्यासाठी, लोक बाजारात उपलब्ध असलेल्या रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करतात. ही उत्पादनं मानवी शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहेत. त्या सगळ्या गोष्टींच्या धुराचा फुफ्फुसावर आणि श्वसन नलीकेवरही वाईट परिणाम होतो. तज्ञांच्या माहितीनुसार, इसेंसियल ऑइल या सगळ्या उत्पादनांच्या जागी वापरायला हवे. याने तुमची डासांची समस्या दुर होईल. यासोबतच शरीराला इतरही अनेक फायदे होतील.

Advertisements

कोणत्या तेलाचा वापर करायला हवा?

Advertisements

✳️लेमनग्रास तेल ठेवले आहे. लेमनग्रासचा उपयोग अनेक रोगांवर औषध म्हणून केला जातो. बाजारात तुम्हाला लेमनग्रास तेल सहज मिळेल. ते अंगावर लावल्याने डास पळून जातात. आपण ते घरात देखील शिंपडू शकता.

✳️सर्वत्र उपलब्ध असणाऱ्या तुळशीच्या तेलात अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात. डासांना घालवण्यासाठी तुम्ही तुळशीचे तेलही वापरू शकता. डास त्याच्या वासापासून दूर राहतात. रात्री झोपण्यापूर्वी अंगावर लावा, हे केल्याने डास चावत नाहीत. याच्या तेलाने मसाज केल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळते.

✳️लॅव्हेंडरच्या सुगंधापासून कीटक दूर पळतात. मच्छरही लॅव्हेंडर तेलानं लांब राहतात. तुम्ही ते घरी शिंपडू शकता. एवढंच काय तर ते तुम्ही अंगावरही लावू शकता. लॅव्हेंडर नैराश्य आणि चिंता यांसारख्या अनेक आजारांपासून आराम देते. तसेच स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळु शकतो.

(Disclaimer: उपरोक्त माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास डॉक्टर किंवा त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Advertisements

About विश्व भारत

Check Also

उन्हाळ्यात थंडगार बर्फाचे पाणी पित असाल तर..!

शरीरातील पाण्याची पातळी राखणे हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे तज्ज्ञ रोज १० ते १२ …

जानिए मनचाही संतान प्राप्ति के लिए नैसर्गिक नियमों का परिपालन और उपाय!

जानिए मनचाही संतान प्राप्ति के लिए नैसर्गिक नियमों का परिपालन और उपाय! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *