Breaking News

राज ठाकरेंना अनभिज्ञ् ठेवण्याचा ‘प्लॅन’ : दुरुगकरच्या कारनाम्यामुळे मनसेला निवडणुकीत फटका!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे आज शुक्रवारी नागपुरात येत आहेत. अनेकांकडून खंडणी घेतल्याच्या आरोपाने मनसेचा नागपूर जिल्हाध्यक्ष (ग्रामीण)आदित्य दुरुगकर याच्यावर राज ठाकरे कोणती कारवाई करणार?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसेची जनमाणसातील प्रतिमा मलीन होत आहे. येत्या काळात महानगरपालिका निवडणूक असल्याने दुरुगकरच्या खंडणीमुळे मनसेला चांगलाच फटका बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या दौऱ्याला विशेष महत्त्व आले आहे.

राज ठाकरे यांच्यासमक्ष खंडणीचा विषय कोणी काढू नये, याची खबरदारी विदर्भातील एक बडा आणि दुरुगकरचा पाठिराखा असलेल्या पदाधिकारी घेत आहे. त्याकरिता नागपूर विमातळापासूनच ठाकरे यांच्या मागेपुढे कार्यकर्त्यांची फौज ठेवली जाणार असल्याचे कळते.

दुरुगकरवर काय आहे आरोप?

दोनच दिवसांपूर्वी दुरुगकर उमरेड तालुक्यातील कुही गावात आपण ‘एफडीए‘चा अधिकारी असल्याचे सांगून दोन लाखांची खंडणी मागताना सापडला होता. त्यावेळी सोबत असलेल्या त्याचे कार्यकर्ते पळून गेले. मात्र दुरुगकरला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. पक्षाची बदनामी होऊ नये आणि दुरुगकरला वाचवण्यासाठी एका पदाधिकाऱ्याने यंत्रणा कामाला लावली. तत्पूर्वी कुही पोलिसांसोबत संपर्क साधला असता त्यांनी तक्रारदार आणि आरोपीचे बयाण घेतले जात आहे. त्यानंतर एफआयर दाखल करणार असल्याचे सांगितले होते. मात्र नंतर मोठी तोडपाणी झाली. आपसात समझाता झाल्याचे सांगून पोलिसांनी हे प्रकरण दडपले. विशेष म्हणजे दुरुकरवर खंडणीच्या अनेक तक्रारी आहेत. यापूर्वी वर्धा येथील एका बार चालकालाही त्याने खंडणी मागितली होती.

दुरुगकरला कशी लागली ‘लॉटरी’…

नोव्हेंबर महिन्यात राज ठाकरे नागपूरला आले होते. त्यांनी संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त केली. मनसेला उभारी देण्यासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर केली. त्यात आदित्य दुरुगकरला लॉटरी लागली. नागपूर ग्रामीणमध्ये दोन तालुक्यांचा अध्यक्ष त्याला केले. अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडताच त्याने गाडीवर मनसेचा झेंडा लावून ठिकठिकाणावरून खंडणी उकळणे सुरू केले. बाऊंसर घेऊन फिरणाऱ्या दुरुगकरने संपूर्ण जिल्ह्याचा आपण अध्यक्ष असल्याचे सांगणे सुरू केले. उमरेडमध्येही घुसखोरी केली. एफडीएचा अधिकारी असल्याचे सांगून येथील एका दुकानात घुसून झाडाझडती घेतली. सुंगधीत तंबाखू आढळल्याने दुकान सिल करावे लागले अशी भीती दाखवली. कारवाई टाळण्यासाठी दोन लाखांची खंडणी मागितली. शेवटी ३० हजारात तडजोड करण्याची तयारी त्याने दर्शवली. या दरम्यान एकाजणाला संशय आला. त्याने दुरुगकरला ओळखपत्र मागितले, त्यामुळे त्याचे बिंग फुटले.

आदित्य दुरुगकरला जिल्हाध्यक्ष करावे याकरिता विदर्भातील एका पदाधिकाऱ्याने मोठी फिल्डिंग लावली होती. राज ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याच्या खर्चाची जबाबदारी त्याच्यावर टाकली होती. जागोजोगी स्वतःचे होडिंग लावून वातावरण निर्मिती केली होती. मुंबईतून आलेल्या काही पदाधिकाऱ्यालाही मॅनेज केले. एवढेच नव्हे तर नागपूरच्या एका पत्रकाराला राज ठाकरे यांना फोन करून दुरुगकरला अध्यक्ष करण्याची विनंती केली होती. हे करित असताना त्याने मनसेच्या काही निष्ठवान पदाधिकाऱ्यांचा बळी दिला. आदित्य दुरुगकर अध्यक्ष होताच पक्षकार्यासाठी वसुलीची मोहीम हाती घेतली. त्यामुळे हिंगण्यातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश घेतला.

About विश्व भारत

Check Also

नागपुरच्या प्रभारी विभागीय आयुक्त पदी डॉ. विपीन इटनकर!आज स्वीकारणार पदभार

अमेरिका येथील जॉन एफ. कॅनडी स्कुलतर्फे आयोजित डिस्टिंग्विश्ड हम्फ्रे फेलोशिप प्रोग्राम ‘लिडरशिप फॉर २१- सेंचुरी’ …

महायुति में सीट बंटवारे को लेकर संजय राउत का चौंकाने वाला दावा

महायुति में सीट बंटवारे को लेकर संजय राउत का चौंकाने वाला दावा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *