आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली. कोलकाता येथील या प्रकरणानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने महिला डॉक्टरांची नाईट शिफ्ट बंद करण्याचा निर्णय घेतला. तशी अधिसूचनाही काढण्यात आली. यावरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फैलावर घेतले.
” तुम्ही महिलांना नाईट ड्यूटी करण्यापासून रोखू शकत नाही. पायलट आणि लष्करात जवान रात्री सुद्धा काम करतात. सुरक्षा पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे”, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचे कान पिळले.