थंडीच्या दिवसात गरमागरम चहा मिळाल्यास उबदारपणा वाढतो. घरच्या घरी आयुर्वेदिक चहा कसा बनवायचा याबाबत येथे सांगणार आहो. इतकेच नव्हे तर त्याचे अनेक फायदेही सांगितले आहेत. यात आयुर्वेदिक काढ्याचा समावेश होतो. खरतरं चहा मुळे आम्लपित्त, भूक मंदावणे अशा एक ना अनेक समस्या उद्भवतात. मात्र चहाचे काही प्रकार असे आहेत की जे तुमची रोग प्रतिकारशक्तीही वाढवू शकतात. तुळस अश्वगंधा, मसाला चहा आणि लेमन-टी यांसारखे चहा तुमची रोगांविरूद्ध लढण्याची क्षमता वाढवते.
तुळशीची ताजी पाने, वाळलेली पाने किंवा पावडर देखील तुळशीच्या पानांचा चहा बनवण्यासाठी वापरता येतो. तुळशीचा चहामुळे कफ, खोकला, सर्दी, दमा किंवा ब्राँकायटिसपासून आराम मिळतो. तुळशीच्या चहामध्ये कफ आणि श्लेष्मापासून मुक्त होणारे घटक असतात. तसेच, एंटीसेप्टिक, अँटीऑक्सिडंट आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात.
तुळशीचा चहा बनवण्यासाठी प्रथम एक ग्लास पाणी उकळा आणि त्यात तुळशीची 8 ते 10 पाने घाला. तुम्हाला हवे असल्यास थोडेसे आले आणि वेलची पूडदेखील घालू शकता. ते 10 मिनिटे उकळी येऊ द्या, नंतर गाळणीने गळून घ्या. त्यात हवे असल्यास मध किंवा लिंबाचा रस घाळून प्या.
हे नका करू….
तुळस चहामध्ये दूध किंवा साखर घालू नका, असे केल्यास त्यातील औषधी गुणधर्म कमी होतात.
(सूचना : उपरोक्त उपाय करताना डॉक्टरचा सल्ला घ्यावा)