Breaking News

चंद्रपुरच्या जंगलात थरार : वाघ आणि मादी बिबट्यात झुंज,कोण जिंकले? वाचा…

Advertisements

चंद्रपूर जिल्ह्यातील तळोळी बाळापूर वनपरिक्षेत्रांतर्गतमधील गोविंदपूर वनक्षेत्रातील येनोली माल बिट कक्ष क्रमांक ६५ मध्ये मादी बिबट मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाघासोबतच्या झुंजीत मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनाधिकाऱ्यांचा आहे.

Advertisements

माहितीनुसार,तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील येनुली मालचे वनरक्षक श्रीरामे गुरुवारी सकाळी गस्तीवर असताना कक्ष क्रमांक ६५ मध्ये अंदाजे दीड ते दोन वर्षे वयाची मादी बिबट मृतावस्थेत आढळली. वाघासोबतच्या झुंजीत तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. मौका पंचनामा केल्यानंतर पशुधन विकास अधिकारी ममता वानखेडे, पशुधन विकास अधिकारी एस.बी. बनाईत यांनी शवविच्छेदन केले. मृत बिबट्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असून अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

राज्यात 15 एप्रिलनंतर पुन्हा पाऊस?

हवामानात का झाले बदल   हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, हवामान झालेल्या या बदलाचे कारण आहे …

नागपूरसह राज्यात शुक्रवारपासून येणार पाऊस!

हवेच्या द्रोणीय स्थितीमुळे आद्रतेचे प्रमाण राज्यात वाढत आहे. त्यामुळे शुक्रवार, पाच एप्रिलपासून चार दिवस राज्यभरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *