Breaking News

लग्नाचे शूटिंग केले जिल्हाधिकारी कार्यालयात : चौकशीचे आदेश

Advertisements

भावी संसाराची स्वप्ने रंगविणाऱ्या जोडप्याने चक्क विनापरवानगी प्री-वेडिंग (लग्नापूर्व) शूटिंग केले. हेरिटेज वास्तू असलेल्या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मंगळवारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत या जोडप्याचे शूटिंग केले.मात्र,त्यांना कोणीही न हटकल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जातेय. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी या प्रकाराची दखल घेत चाैकशीचे आदेश दिले.

Advertisements

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तहसीलदार, प्रांत तसेच विवाह नोंदणी अधिकारी कार्यालये आहेत. याच विवाह नोंदणी कार्यालयात विवाहेच्छुक असलेले युवक नोंदणीसाठी येतात. मंगळवारीही असेच एक जोडपे विवाह नोंदणीसाठी आले. मात्र, परिसरातील हेरिटेज वास्तू पाहून हे जोडपे त्याच्या प्रेमात पडले. मोह अनावर झालेल्या या दाम्पत्याने तेथेच फोटो शूटिंग सुरू केले. विशेष म्हणजे जोडप्यासोबत असलेल्या कॅमेरामननेही तत्काळ त्यांच्या विविध अँगलमधून या दाम्पत्याचे छायाचित्र काढले.

Advertisements

चौकशी होणार?

कार्यालयाच्या परिसरात विनापरवानगी प्री-वेडिंग शूट केले जात असताना तेथे उपस्थित सुरक्षारक्षक किंवा कर्मचाऱ्यांनी सदर जोडप्याला न हटकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा सर्व जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तातडीने अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधित जोडप्याला समज देण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

राज्यातील रस्त्यांची कामे ठप्प : कंत्राटदारांचे कामबंद आंदोलन सुरु

राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करुनही शासकीय कामांची दीड वर्ष झाली तरी थकीत दयेके मिळत नसल्याने …

कंत्राटदार ७ एप्रिलपासून कामबंद करणार : फडणवीस सरकारवर रोष

जिल्हा पातळीवर केलेल्या शासकीय कामांची देयके गेली १६ महिने मिळत नसल्याने राज्यातील शासकीय कंत्राटदारांनी ७ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *