Breaking News

नागपूरजवळ अंधश्रद्धेतून झाली वाघाची शिकार : 7 आरोपीना अटक

Advertisements

महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील पवनी बफर वन क्षेत्रात 12 जानेवारीला वाघाची शिकार झाली.या प्रकरणात 7 आरोपींना अटक करण्यात आली. सध्या सर्व आरोपी नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात आहे. आरोपींकडून मिळालेली माहिती पडताळण्याचे काम सुरू आहे. त्यावरून वाघाची शिकार अंधश्रद्धेतून झाल्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

Advertisements

यातील अटक केलेल्या जितेंद्र वरखडे या आरोपीने गुन्ह्यात वापरलेले एक हत्यार दाखवले. त्याला वन विभागाने जप्त केले. ताब्यात असलेल्या दोन्ही आरोपींना मंगळवारी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, रामटेक यांच्या समोर हजर करण्यात आले. त्यांना 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Advertisements

आरोपींनी विजेच्या तारांचा करंट लावून वाघाची शिकार केल्याचे व नंतर मृत शरीर कापून पंजे, कवटी, मिश्या, काही हाडे व दात काढले असल्याचे निष्पन्न झाले आहे. वाघाच्या अवयवाचा वापर अंधश्रध्देच्या कल्पना पूर्ण करण्यासाठी केला असण्याची तसेच इतरांना विक्री केल्याची शक्यता आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

जिल्हाधिकाऱ्यांचे छायाचित्र वापरून नागरिकांकडे पैशांची मागणी

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे छायाचित्र वापरून ‘व्हॉट्स ॲप’वर आरोपीने बनावट खाते उघडले. या खात्यावरून नागरिकांकडे …

विवाहोत्सव की शूटिंग करने नागपुर से गोटेगांव जाते समय टिप्पर से टकराई कार के परखच्चे उडे

विवाहोत्सव की शूटिंग करने नागपुर से गोटेगांव जाते समय टिप्पर से टकराई कार के परखच्चे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *