Breaking News

नागपुरात आहे राज्यातील सर्वात उंच शिवमूर्ती

महाशिवरात्रीनिमित्ताने सर्व शिव मंदिरे आकर्षक पद्धतीने सजली आहेत. नागपूर शहरातील नंदनवन भागात असलेली 51 फुट उभी शंकराची मूर्ती ही केवळ नागपुरातीलच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्रात उंच शंकराची मूर्ती आहे. महाशिवारात्रीच्या निमित्ताने या मंदिरात लाखो भक्तांची गर्दी होते. त्याचबरोबर हे मंदिर अनेकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे.

यंदा काय आकर्षण?

आदि आणि अनंताची महादेवता अशी महाशिवाची ओळख आहे. नागपूर शहराला गोंड राजवटीसह भोसलेकालिन प्राचीन इतिहास लाभला आहे. या शहरात देखील अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक शिव मंदिरं आहेत. त्याचबरोबर एक पुरातन शिव मंदिर शहराच्या नंदनवन भागात आहे. याच मंदिराच्या शेजारी 51 फूट उभ्या स्वरूपाची भव्य अशी विलोभनीय मूर्ती आहे. ही मूर्ती ही संपूर्ण महाराष्ट्रातील उंच मूर्ती असल्याचं मानलं जातं. या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची सकाळपासूनच मोठी गर्दी होते. लाखो भाविक इथं दर्शनासाठी येतात.

यंदा आम्ही 251 विवाहित जोडप्यांचे लक्ष रुद्राभिषेकाचे ठेवले आहे. नागपुरातूनच नव्हे तर नागपुराच्या बाहेरून देखील भाविक इथं दर्शनासाठी येतात. दरवर्षी लघु रुद्राभिषेकचे आयोजन केले आहे. यासाठी सर्व समाजतील लोक येथे येऊन सक्रिय सहभाग नोंदवत असतात.

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील कोराडीत वेतनवाढ मिळाल्याने वीज कामगारांचा जल्लोष

नागपुरातील कोराडीत वेतनवाढ मिळाल्याने वीज कामगारांचा जल्लोष टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट कोराडी। नोव्हेंबरमध्ये होणारी …

BJP प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा मुलगा कारमध्ये असल्याचे उघड : प्रशासनाचा धक्कादायक खुलासा

सध्या गाजत असलेल्या नागपूरच्या ‘हिट अँड रन’ प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी आणखी एक महत्वाची माहिती उघड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *