Breaking News

सावधान!5 पदार्थ लिव्हर आणि किडनीसाठी घातक

Advertisements

जे पदार्थ खातो, त्याबाबत बऱ्याचवेळा आपल्याला माहिती नसते की, याचा आरोग्यावर काय परिणाम होईल. बर्‍याच लोकांना हे माहित नसेल की अमोनिया अन्नपदार्थांमध्येही आढळतो. बहुतेक प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये अमोनिया आढळतात. परंतु अशा अनेक भाज्या आहेत, ज्यामध्ये अमोनिया आधीपासूनच आहे. जर ते जास्त प्रमाणात सेवन केले तर ते शरीराला मोठा धोका पोहोचवतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर आहारावर नियंत्रण सर्वात महत्त्वाचे आहे. आहार खराब असेल तर शरीराची स्थिती बिघडत जाते. अमोनियाचा सर्रास वापर अनेक गोष्टींमध्ये होतो. वस्तू स्वच्छ करण्यासाठी कारखान्यांमध्ये याचा वापर केला जातो. हे लादी स्वच्छ करण्यासाठीही वापरले जाते.

Advertisements

जर अमोनियाची पातळी मर्यादित असेल तर मूत्रपिंड आणि लिव्हर ते काढून टाकतात. पण जर त्याची पातळी जास्त असेल तर ते मेंदू, किडनी आणि लिव्हरला नुकसान पोहोचवते. त्यामुळे सर्दी-खोकला जास्त होतो. त्वचेवर पुरळ येतात. जेव्हा जास्त अमोनिया शरीरात प्रवेश करतो तेव्हा श्वास घेण्यास त्रास होतो.

Advertisements

या पदार्थांमध्ये अमोनिया जास्त

कांदा

कांदा खूप आवडीने खाल्ला जातो. परंतु 100 ग्रॅम कांद्यामध्ये 0.027 ग्रॅम अमोनिया असतो. ही पातळी खूप कमी असली तरी वारंवार कांदा खाल्ल्याने शरीराला हानी पोहोचते.

बटाटा चिप्स

बटाटा चिप्समध्ये मोठ्या प्रमाणात अमोनिया आढळतो. पॅकेज केलेल्या वस्तूंमध्ये अमोनियाचे प्रमाण कमी असते. 100 ग्रॅम बटाटा चिप्समध्ये अमोनियाची पातळी 0.024 ग्रॅम असते. पण ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने अमोनियाची पातळी वाढू शकते.

मांस उत्पादने

मांसावर प्रक्रिया करुन बनवलेल्या वस्तूंमध्ये अमोनियाची पातळी खूप जास्त असते. सलामी मांस पिझ्झा, सँडविच, पास्ता आणि सॅलडमध्ये जोडले जाते. त्यामुळे त्यांचे सेवन कमी प्रमाणात करावे.

पीनट्स बटर

सुमारे 100 ग्रॅम पीनट बटरमध्ये अमोनियाची पातळी 0.049 ग्रॅम असते. त्यात असलेला अमोनिया देखील शरीराला हानी पोहोचवू शकतो.

चीज

चीजमध्ये अमोनिया मोठ्या प्रमाणात आढळतो. सँडविच, बर्गर, पिझ्झा आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. बहुतेक सॅच्युरेटेड ब्लू चीजमध्ये अमोनिया आढळतो.

(Disclaimer: उपरोक्त माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ‘विश्व भारत’ याची पुष्टी करत नाही.)

Advertisements

About विश्व भारत

Check Also

‘ब्लड प्रेशर’मध्ये ‘चालणे’ किती महत्वाचे?

धावपळीच्या जीवनात स्वतःला फिट ठेवण्यासाठी तासन् तास जिममध्ये घाम गाळणे प्रत्येकालाच शक्य नसते. अशा वेळी …

नागपुर : डागा स्त्री अस्पताल बना ‘लापरवाही का अड्डा’

नागपुर : डागा स्त्री अस्पताल बना ‘लापरवाही का अड्डा’ टेकचंद्र शास्त्री: 9822550220   नागपुर। धुएं …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *