अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळीच्या लग्नाबद्दलची चर्चा सुरु आहे. काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्ता माळीने लग्नाची अट सांगितली आहे.
प्राजक्ता माळीने दोन वर्षांपूर्वी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत प्राजक्ताने लग्नाबद्दल काही खास गोष्टी शेअर केल्या होत्या. यावेळी तिने “मी लग्न करायला तयार आहे”, असे म्हटले होते. मात्र माझी एक अट आहे, असेही तिने सांगितले होते.
पण मला नवरा मुलगा मिळाला की मी लग्न करेन. पण केव्हा याची माहिती नाही. मला निर्व्यसनी मुलगा हवा आहे, हीच माझी पहिली अपेक्षा आहे. माझा होणारा नवरा हा निर्व्यसनी असावा, हीच माझी अट आहे”, असे तिने यावेळी म्हटले होते.
काही दिवसांपूर्वी प्राजक्ता श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात गेली होती. त्यावेळी तिने त्यांना लग्नाबाबत प्रश्न विचारला होता. “लग्न करणं गरजेचंच आहे का?” असे प्राजक्ताने विचारले होते. यावर श्री श्री रविशंकर यांनी उत्तर दिलं की, “तू मला विचारत आहेस. असं असतं तर कधीच माझ्या बाजूला अजून एक खुर्ची लागली असती. लग्न केलंच पाहिजे हे काही गरजेचं नाही.”