Breaking News

टायर फुटून बसचा अपघात नाही : RTO चा धक्कादायक अहवाल, कशाने झाला अपघात? वाचा

Advertisements

विदर्भ ट्रॅव्हल्स खासगी बसचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. ही बस एसी बस असल्याची माहिती मिळाली आहे. नागपूरहून ती पुण्याच्या दिशेने येत असताना अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातातून ड्रायव्हर वाचला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून चौकशी सुरू आहे.

Advertisements

या अपघातानंतर आता तपास सुरू झाला आहे. आरटीओकडून प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात आणि ड्रायव्हरने दिलेल्या माहितीमध्ये तफावत आहे. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार टायर फुटून भीषण अपघात झाला. मात्र आरटीओनं दिलेल्या अहवालात बसचा टायर फुटलाच नाही अशी माहिती समोर आली आहे.

Advertisements

टायर फुटल्याने बसचा अपघात झाला नाही. बस अपघातातबाबत अमरावतीच्या आरटीओने अहवाल सादर केला आहे. या प्रकरणी गृह विभागाकडून अपघाताची चौकशी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आत्तापर्यंत सर्वात भीषण असा अपघात झाला आहे. विदर्भ ट्रॅव्हल्स ची खाजगी बस नागपूर वरून 30 प्रवासी घेऊन पुण्याकडे जात होती मध्यरात्री दोन वाजेच्या दरम्यान ही बस समृद्धी महामार्गावर सिमेंटच्या कठड्याला जाऊन धडकली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *